*कंधार प्रतिनिधी- संतोष कांबळे*
दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी धान कलंजीयम फाउंडेशन, ऍक्सिस बँक लिमिटेड आणि समुदाय आर्थिक साक्षरता केंद्र कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता आणि बँकेची सेवा विषयी माहिती तालुक्यातील इमामवाडी, नवरंगपुरा, लालवाडी, पांगरा व संगुचीवाडी आदी गावामध्ये पटनाट्याच्या माध्यमातून बँकेचे व्यवहार आर्थिक साक्षरता विषयी जनजागृती करण्यात आले.
बँकेतील व्यवहाराविषयी आर्थिक नियोजन कशाप्रकारे करावे या विषयी पटनाट्याच्या माध्यमातून आर्थिक नियोजन आणि अंदाजपत्रक, बचत आणि गुंतवणूक, विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, पिक विमा, आणि पशु धनाचा विमा, कर्ज आणि परतफेड, डिजिटल बँकिंग, ग्राहक संरक्षण आणि शिक्षण या विषयी तालुक्यातील विविध ग्रामीण भागात जनजागृती करण्यात आली.
यावेळी धान कलंजीयम चे मदुराईच्या उमा राणी मॅडम, राज्य समन्वयक नागराज सर
यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अधिकारी अनिल दवणे सी एफ एल सी यवतमाळ, कंधार सी एफ एल सी चे तालुका समन्वयक ऋषिकेश सोळंके, वैभव चव्हाण, साई चव्हाण, राहुल शिरसे, सहयोगिनी कालींदा कागणे, अलका गुंडे, दैवशाला केंद्रे, ज्योती बुटेवाड, लता लुटे, वैशाली गंदलपवाड व गावातील सरपंच यांनी उपस्थिती लावली.बँकेचे ऑनलाइन व्यवहार बँकेविषयी सतर्कता, फायदे सुरक्षा विमा याविषयी पटनाट्यच्या माध्यमातून जनजागृतीचे सादर केले.आर्थिक साक्षरता जनजागृती करताना आपल्या दैनंदिन जीवनातील कुटुंबाचे आर्थिक नियोजन, कुटुंबासाठी लागणारी खर्चाचे अंदाजपत्रक, कुटुंबाचे मासिक खर्च किती आहे आणि मासिक उत्पन्न किती आहे त्यानुसार आर्थिक नियोजन करणे आणि महिन्याचे उत्पन्नातून किमान २५% टक्के बचत कशी केली पाहिजे, बचत ही नेहमी भारतीय रिझर्व बँक यांच्या नोंदणी कृती संस्थेमध्येच केली पाहिजे जसे की राष्ट्रकृत पोस्ट ऑफिस तसेच कुटुंबातील सर्व सभासदांचे विमा काढणे निदान स्वतःचा विमा काढणे आवश्यक का आहे याबद्दल सखोल माहिती पटनाट्याच्या माध्यमातून सादर केली. सोबतच ४३६ रुपयाचा प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि २० रुपयाचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा यांचा फायदा आपणास व आपल्या कुटुंबास कसा होईल याबद्दल सखोल अशी माहिती यातून देण्यात आली
१८ ते ४० वयोगटातील पुरुष व महिलांना तसेच युवकांना आपल्या वध्दकाळात पेन्शन मिळण्यासाठी अटल पेन्शन योजने चा लाभ कसा घेतला पाहिजे हे गावातील नागरिकांना माहिती देण्यात आली.० ते १० वर्षातील आपल्या लाडक्या लेकीसाठी सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस मध्ये चालू केली पाहिजे त्याचा फायदा मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी उपयोगी होईल. नागरिकांनी राष्ट्रकृत बँक किंवा भारतीय रिझर्व बँक यांच्या नोंदणीकृत संस्थेमार्फतच कर्ज घ्यावे आणि हे कर्ज योग्य कामासाठी, व्यवसायासाठी त्याचा वापर करावा घेतलेल्या कर्जाचे परतफेड नियमितपणे करावे जर व्याज आणि मुद्दल सहित परतफेड केली तर आपले क्रेडिट चांगले तयार होईल आणि आपला सिबिल स्कोर वाढला जाईल. सध्या सगळीकडे डिजिटल बँकिंगचे युग आहे त्यामुळे सर्वांनी डिजिटल होणे आवश्यक आहे ऑनलाइन व्यवहार च्या माध्यमातून आपण बाहेरगावी शिक्षण घेत असलेल्या मुलांना पैसे पाठवू शकतो घरी बसून लाईट बिल भरू शकतो, घर उपयोगी वस्तू ऑनलाइनच्या माध्यमातून पैशाचा व्यवहार करू शकतो.
कोणतीही बँक फोन करून तुमचा ए टी एम पिन किंवा ओ टी पी विचारत नाही कोनीही आपल्या बँक खातेची किंवा वैयक्तिक माहिती कुणाला सांगू नये किंवा मोबाईल वर आलेली कोणतीही लिंक ओपन करू नयेत.
जर असे काही आपल्या सोबत झाले तर १४४४८ या टोल फ्री नंबर वर कॉल करून आपली तक्रार नोंदवा किंवा संबंधीत बँक शाखेला भेट देऊन रीतसर तक्रार द्या.
पटनाट्याचे सादरीकरण तालुक्यातील इमामवाडी, नवरंगपुरा, लालवाडी, पांगरा व संगुचीवाडी आदी गावात सादर करण्यात आले यावेळी गावातील कामगार, महिला व पुरुष आणि युवक मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील सरपंच, प्रतिष्ठित नागरिक सी एफ एल सी मित्र आणि गावातील पुरुष, महिला आणि युवक यांनी सहकार्य केले.