नांदेड : लोक स्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात संविधान व लोकशाही बचाव जागृती अभियान राबविण्यात येत असून येथे 29 डिसेंबर रविवार दुपारी एक वाजता हदगाव जिल्हा नांदेड येथे संविधान व सामाजिक न्याय प्रतिज्ञा परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सदर परिषदेस बहुसंख्य संविधान प्रेमी लोकशाहीवादी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन लोकस्वराज्य आंदोलनाचे नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्ष धोंडोपंत बनसोडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
सत्तेत असलेले सत्ताधारी, धर्म मार्तंड आणि भांडवलदार लोकांकडून देशाच्या संविधानाला व पर्यायाने लोकशाहीला मोठ्या प्रमाणात धोका पोहोचवण्याचे काम चालू असून अशा प्रवृत्तीच्या पासून संविधानाचे व लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी येत्या काळामध्ये हजारो तरुणांना प्रशिक्षित करून संविधानाच्या संरक्षणाची प्रतिज्ञा तरूणांना देण्यात येणार आहे, त्याचाच एक भाग म्हणून सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे नमूद करून धोंडोपंत बनसोडे यांनी म्हटले आहे की लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून राज्यात अशा परिषदांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येणार आहे सदर परिषदेस लेखक, कायद्याच्या अभ्यासक, विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
संत रविदास सभागृह येथे आयोजित परिषद आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामचंद्र भरांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी डॉ आनंद भंडारे किनवट, डॉ. मारुती वाघमारे हिमायतनगर, एड हरि दर्शनवाढ किनवट, साहित्यिक नागोराव नामेवार नांदेड यांना प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी आंदोलनाचे नेते व्ही जी डोईवाड, रावसाहेब पवार, गणपत रेडी व इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत सदर परिषदेच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा कामगार आघाडीचे संघटक संजय खानजोडे, हिमायतनगर तालुका अध्यक्ष सदानंद आयरनकर, हादगावचे तालुका अध्यक्ष दयानंद गायकवाड, जिल्हा पदाधिकारी बाबुराव दोडके, उपाध्यक्ष अनिल काळे, कैलास वारोळे, अविनाश खांजोडे, शिवाजी दोडके, अरुण गायकवाड, रघुनाथ खांजोडे व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत