कंधार शहरातील भुकेल्या रस्ता दुभाजकाचे बोलके शल्य! लेखन-गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी

 

 

 

ऐतिहासिक कंधार म्हटले की, राष्ट्रकुट कालीन राजेशाहीचे नगर असे म्हणताच मला “आकाश ठेंगणे” वाटते.माझ्या कंधार नगरीची वास्तूकला आणि शिल्पकला ठळक होती,आज त्याची साक्ष उत्खनन करतांना अनेक सुबक अन् सुंदर व अप्रतिम मुर्त्याचे दर्शन होते.पण २०१२ या वर्षी माझ्या नगरीच्या बाजार पेठेवर “गाढवाचा नांगर”फिरवला जावून शहर उध्वस्त करण्यात आले होते.तेंव्हापासून माझ्या नगरीच्या मुख्य रस्त्याची वाताहत झाली होती.जवळपास एक तपाच्या कालखंडात नंतर अनेक सत्याग्रह हस्ते परास्ते करावे लागले.सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे निविदा निघून संभाजी कंस्ट्रक्शन कंधार यांच्या गुत्तेदारी कामातून महाराणा प्रताप चौक ते छ.शिवाजी महाराज चौकाच्या दरम्यान मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले.खरे पण ये-जा करणाऱ्या मेनरोडवर शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी माझी निर्मिती तर झाली.पण एक वर्ष होत आहे.रस्त्याचे दोन भाग माझ्यामुळेच झाले.माझ्या पोटाची खळगी रिकामी असून माझ्या पोटात कावळे काव ऽऽ काव ऽऽऽ! करत आहेत.पण कंधार नगर परिषद जाणुन बुजून माझ्याकडे दुर्लक्ष करीत आहे.काल परवाच दुकानाच्या लिलावातून करोडपती झालेली माझ्या नगरीची नगर पालिका मला सावत्रपणाची वागणुक देत आहे.कारण माझ्या गारीत मृदा टाकून बोॅर्डर, पुष्पवृक्ष विद्यूत रोषणाईचे खांब उभे करण्या ऐवजी रिकामा पसारा,भंगार व कचरा कुडींची अवस्था माझी केल्याने मला अतिव दुःख होत आहे.

मला वाटते आहे,मीच का?कंधार शहरातील दुभाजक? असा यक्षप्रश्न पडतो आहे.अरे हां राहिलेकी!नंदीग्राम नगरी नांदेडकडे जाजाणाऱ्या मार्गावर म्हणजे हू. माणिकराव काळे रोड कंधार या प्रमुख रस्त्यावरही हीच परिस्थिती आहे.येऊ घातलेल्या उन्हाळ्यात माझे अन्न म्हणजे माती,टाकून त्या येणाऱ्या मृगनक्षत्रात त्यात शोभेच्या वृक्ष, रोपटे, बाॅर्डर लावून कंधार शहरातील सौंदर्यात चार चांद लावावेत!अशी विनंती मी करतो आहे.आपलाच-कंधार शहरातील भुकेला रस्ता दुभाजक.माझे दुःख गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार यांनी माझे बोलके शल्य शब्दबद्ध करुन माझे बोलके केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *