कंधार ; प्रतिनिधी
मन्याड खोरे म्हणटले की,आठवते तो शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला.कारण उभ्या आयुष्यात लाल कंधारी कृष्ण-सुदामा जोडीने म्हणजे डाॅ.भाई केशवराव धोंडगे व भाई गुरुनाथराव कुरुडे या मित्र व्दयांनी मन्याड नदी पात्रातील गुळगुळीत गोट्यांना आणि डोंगर दऱ्यातच्या दगड गोटाळांना स्वाभिमानाचे धडे देत शहाणपणा शिकवला.आज सद्गगुरु आदिवासी आश्रम शाळेत मातोश्री सुलोचना गुरुनाथराव कुरुडे यांच्या चीर समाधीस्थळाच्या समोर क्रांतिभुवन बहाद्दरपुरा नगरीच्या वतीने क्रांति टावर जवळून वाजत गाजत लोकनेते गुरुनाथराव कुरुडे ज्यूनिअर काॅलेजच्या प्रांगणात श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेचे अध्यक्ष प्रा.डाॅ.भाई पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन गावकऱ्यांच्या वतीने शर्करातुला करुन करण्यात आले.त्यानंतर नांदेड, मुखेड, डिघोळ देशमुख,कंधार, बहाद्दरपूरा आदी नगरीतील निराळी विणकर समाजातील भाई कुरुडे साहेब यांच्या चाहत्यांनी कार्यक्रम आयोजित केला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा-ग्रामीण लेखिका,कुरुडे परिवाराच्या निकटवर्तीय चंद्रप्रभावतीबाई केशवराव धोंडगे माय यांच्या अध्यक्षतेखाली अभिष्टचिंतन सोहळा पार पडला.अध्यक्षा चंद्रप्रभावतीबाई यांचा सत्कार संस्थेचे सचिव डाॅ.शीतल मिथुन पारेकर यांनी केला.नंतरनिराळी समाज सेवा प्रतिष्ठान नांदेडचे कार्यकर्ते,जि.प. इज्जतगाव शाळेचे सेवापूर्तीच्या उंबरठ्यावर असलेले आदर्श मुख्याध्यापक चंद्रकांत दामेकर यांनी उत्कृष्ट वकृत्व कलेचा वास्तूपाठ सादर करत अभिष्टचिंतन केले.साहित्यिक नारायणराव पारेकर, प्रा. राजकुमार ढवळे,मराठवाड्यातील शिक्षकनेते सूर्यकांतराव विश्वासराव यांनी आपले मनोगत मांडत सदिच्छा दिल्या.याच कार्यक्रमात कै.ऊल्हास मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष भाई दत्तात्रयराव कुरुडे यांचा सत्कार केला.
कंधारचे माजी नगराध्यक्ष भाई पंढरीनाथराव कुरुडे व प्रा.वैजनाथराव कुरुडे या भाईंच्या बंधुराज जोड गोळीचा सत्कार केला. भाई कुरुडे यांची कोरोना काळात सेवा करणारे निलेश गायकवाड, बळीराम पेठकर या दोन सहकार्याचा सत्कार केला.लेखक, कवि साहित्यिक म्हणून गोपाळसुत दत्तात्रय एमेकर यांचा सन्मान केला.कै.ऊल्हास मेमोरियल ट्रस्टचे व्यवस्थापन करणारे प्रदीप इंदूरकर यांचा सत्कार केला.कै.उल्हास मेमोरियल ट्रस्ट या संस्थेतील सर्व शाखेतील मुख्याध्यापक व सर्व स्टाफ यांच्या वतीने राजाराम देशमुख हायस्कूल टेळकी,माणिक विद्यालय हाडोळी व सद्गुरु आदिवासी आश्रम शाळा यांचे वतीने मन्याड खोर्यातील पारंपारिक खारीक-खोबऱ्याच्या हाराने अभिष्टचिंतन सोहळ्यात भाई कुरुडे साहेब मनोगत व्यक्त करतांना भावूक झाले.मी लोखंड होतो पण भाई केशवराव धोंडगे यांच्या परिस्पर्शाने माझ्या जीवनाचे खरचं सोने झाले!एका अल्पसंख्याक निराळी समाजातील विणकर होतो,पण मी आज इथे जो आहे ते फक्त भाई धोंडगे यांचेमुळे!आहे.अध्यक्षी समारोप करताना धोंडगे माय म्हणाले आमचे सर्व कांही गुरुनाथरावांनी केले.माझ्या सोयरीक त्यांनीच घडवून आणली.रक्ताचे नाते नसले तरी त्या नात्याला लाजवेल असेच कार्य त्यांनी केले.असे भावनाप्रधान मनोगत शब्दात मांडतांना शब्द कमी पण अश्रूंना वाट मोकळी करतांना चंद्रप्रभावतीबाई धोंडगे यांच्या डोळ्यात महापूर आला.उत्कृष्ट सूत्रसंचालन शरद फुलवळे सर यांनी केले.