मुखेड: शहर व परिसरातील शाळा, बालसंस्कार वर्ग, ग्राम अभियान व इतर ठिकाणा विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणातील उपस्थितीत कायदेविषयक मार्गदर्शन संपन्न झाले.
कार्यक्रमास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर स्तोत्र मंत्र पठण आदर्श दिनचर्या बालसंस्कार वर्गाचे महत्त्व सांगण्यासाठी नाटिका सादर करण्यात आल्या. चित्रकला रांगोळी व इतर स्पर्धा त्यासोबत अध्यात्म विज्ञान स्तोत्र मंत्र पठण चे महत्व, पेपर सोडून घेणे परिवारातील संस्कार या सर्व गोष्टी व नितीन भाऊ ,यांचे मार्गदर्शनानुसार सर्व कार्यक्रम घेण्यात आले. शिबिरास विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.