मुखेड: (दादाराव आगलावे)
सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय नांदेड येथे शुक्रवारी सर्व मुख्याध्यापकांची विशेष बैठक श्री संतोष हराळे सहसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे, निरीक्षक आर. डी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळेतील मुख्याध्यापकांची उपस्थिती होती. या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील निपुण भारत प्रशिक्षण संदर्भात आढावा घेण्यात आला व तसेच जिल्हातील आश्रमशाळेतील शैक्षणिक प्रगती व क्रीडा स्पर्धा व विविध बाह्य परीक्षाना विदयार्थी बसविणे व आश्रम शाळेची संख्यात्मक व गुणात्मक प्रगती व्हावी यावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी ता. मुखेड या शाळेतील अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे मध्ये सहभागी झाले होते, तसेच NMMS परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता दहावी निकाल अनेक उपक्रम यामध्ये हि शाळा नेहमी अगरगण्य असते. म्हणून प्रशाळेचे मुख्याध्यापक संदीप लक्ष्मणराव गेटकेवार यांचा सह संचालक संतोष हराळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मा. सहायक आयुक्त आदरणीय शिवानंदजी मिनिगीरे साहेब, निरीक्षक आर. डी. सूर्यवंशी साहेब, महेश इंगेवाड, रवी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.या कौतुकाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व कर्मचारी सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले. या यशाबद्दल संदीप गेटकेवार
यांचे संस्थेचे सचिव गंगाधरराव राठोड, आमदार डॉ. तुषार राठोड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

