कंधार ; काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्थतज्ञ माजी पंतप्रधान मा. मनमोहन सिंग जी यांचे दुःखद निधन झाल्यामुळे आपल्या भारत देशात सात दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून मी सुद्धा त्या दुःखात सहभागी आहे. या कारणास्तव मी माझा जन्मदिवस म्हणजेच वाढदिवस दि.३० डिसेंबर रोजीचा कोणत्याही प्रकारे साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी वैयक्तिक कोणत्याही कार्यक्रमास उपस्थित राहू शकत नाही व आपली प्रत्यक्ष भेट घेता येणार नाही, तरीपण माझ्या जिव्हाळाच्या व्यक्तींना सांगू इच्छतो की, आपले सदैव शुभेच्छा, आशीर्वाद हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत याच शुभाशीर्वादावर मी आजपर्यंत इथपर्यंत आलो आहे. हे मला विसरता येणार नाही. तुम्ही दिलेला आशीर्वाद हा माझा जिवनाचा ऊर्जास्त्रोत्र आहे. त्यासाठी मला भेटण्यास व शुभेच्छा देण्यासाठी हार, फुले, गुच्छ घेऊन येऊ नयेत. आपण सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा द्याव्यात मी मोठ्या मनाने स्वीकार करून स्मरणात ठेवेन धन्यवाद !
: सदैव आपलाच :
संजय ईश्वरराव भोसीकर कार्याध्यक्ष-जिल्हा काँग्रेस कमिटी, नांदेड.