संपूर्ण भारत या देशाला परिचित असणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब सर्वसामान्यांना न्याय देण्याचे कार्य भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बहादरपूरा येथील रहिवासी आहेत परंतु प्रदेश वाद न पाहता जातीपाताच्या धर्माच्या पलीकडे जावून सर्व लोकांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य केले आहे. डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब एक ज्येष्ठ विचारवंत व नावाजलेले लेखक त्याप्रमाणे क्रांतीसुर्य व ज्ञानाचा सागर म्हणून साहेबांची ओळख आहे .
साहेबांचे राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ,कृषी विषयक, जलसंधारण विषयक, महिला विषयक अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय अशा स्वरूपाचे कार्य कार्य डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब यांनी केलेले आहे. भाई साहेब यांनी शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून गोरगरीब मुलांना खेड्यापाड्यातील मुलांना अनाथ मुलांना दूरडीतील भाकरी खावून शिक्षण घेता आले पाहिजे या चांगल्या हेतुने श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीची स्थापना कंधार येथे केली आज या संस्थेचा वटवृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे .
या संस्थेच्या माध्यमातून भारतातील व महाराष्ट्र राज्यातील अनेक कार्यालयामध्ये श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी नोकरीला लागलेले आहेत .बरेच विद्यार्थी सांगतात की आम्ही शिक्षण घेतलं आणि आम्हाला नोकरी लागली फक्त भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांच्यामुळेच यांनी शाळा काढल्या म्हणून आम्ही शिक्षण घेऊ शकलो म्हणजे साहेबांनी मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील खऱ्या अर्थाने शिक्षणाची ज्योत पेटवण्याचे कार्य केले आहे.
आज सद्यस्थितीला श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचा मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे संभाजीनगर पर्यंत अनेक शाखा निर्माण झालेल्या आहेत .आणि विविध माध्यमातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व डॉ. केशवरावजी साहेब यांनी नाही रे वाल्यांना न्याय दिला आहे त्याच पद्धतीने कार्ल मार्क्स यांची विचारधारा समाजामध्ये रुजवण्याचे कार्य केलेले आहे.
ज्याप्रमाणे कार्ल मार्क्स यांनी समाजातील वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला त्याचप्रमाणे भाई डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांनी समाजातील अनेक घटकांचा अभ्यास करून समाजातील दिन दलित गोरगरीब सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेले आहे .म्हणून नाही रे वाल्यांचे कैवारी म्हणून भाई ओळखले जातात आणि त्यांचे विचार आपल्यामध्ये आहेत. आणि आपले सामाजिक बांधिलकी जपून समाजातील उपेक्षित लोक यांना न्याय दिला ज्यांना कोणीच जवळ घेत नव्हतेअशा गोरगरीब लोकांना ल प्रेमाची सावली देवून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे कार्य केले आहे. त्यांना समजून घेण्याचं कार्य डॉ. केशवरावजी धोंडगे साहेब यांनी केलेले आहे. गुराखी गडावर साहित्य संमेलन भरवून उपेक्षित लोक यांना अध्यक्ष करणे त्यांच्यावरून प्रेमाचा हात फिरवून त्यांना न्याय देणे त्यांचे प्रश्न समजून घेणे विविध उपेक्षित लोकांच्या मुलाखती घेणे अशा सर्व उपेक्षित लोकांना गुराखीगडावर न्याय देण्याचे कार्य केले आहे . जगातील आगळे वेगळे गुराखी साहित्य संमेलन संमेलन भरवण्याचे कार्य केशवरावजी साहेब यांच्या माध्यमातून केले जात होते.
गुराखी साहित्य संमेल अध्यक्ष म्हणून अपेक्षित लोकांना अध्यक्ष करून त्यांना मानसन्मान दिला जात असे त्यांची विचारपूस करून त्यांची मुलाखत घेणे तळागाळातील लोकांना आर्थिक मदत करून त्यांचे संसार उभे करण्याचे कार्य डॉ. केशवरावजी साहेब यांनी केले आहे. साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून प्रा. डॉ. पुरुषोत्तमरावजी केशवराव धोंडगे साहेब यांनी गुराखी साहित्य संमेलन भरवून गोरगरीब लोकांना आजही मदत करत असतात भाऊचा डब्बा आजही अविरतपणे चालू आहे आणि एक सामाजिक कार्य प्राध्यापक डॉ. पुरुषोत्तमरावजी केशवरावजी धोंडगे साहेब यांनी केलेले आहेत .
०१ जानेवारी २०२२ रोजी संपूर्ण भारत देश शोक सागरामध्ये बुडालेला होता.भाई डॉ.केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्त त्यांना विनम्र अभिवादन व मानाची जय क्रांति!!
*श्री. सूर्यवंशी एम .एस .(सहशिक्षक) श्री संत गाडगे महाराज हायस्कूल लोहा ता. लोहा जि. नांदेड.*