कंधार/ता.प्र.
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व आमदार,शिक्षणमहर्षी,मन्याड खोऱ्यातील शेकापचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त बहाद्दरपुरा येथे दि.एक जानेवारी रोज बुधवारी सकाळी १०:०० वाजता प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
१ जानेवारी २०२३ रोजी भाईंनी वयाच्या १०२ व्यावर्षी जगाचा निरोप घेतला.१ जानेवारी बुधवार रोजी दुसरा स्मृतिदिन साजरा करण्यात येत आहे.बहाद्दरपुरा येथे सकाळी १०:०० वाजता ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांच्या कीर्तन व तदनंतर दुपारी १२:१५ वाजता भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्ताने मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील व राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर,भाईंवरती प्रेम करणारे सर्व अठरा पगड जाती धर्मातील चाहते उपस्थित राहणार आहेत.मन्याड खोऱ्यातील सर्व जनतेने कीर्तन सोहळ्यासाठी व भोजनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम केशवराव धोंडगे यांनी केले आहे.