आज सकाळी सात वाजता आमच्या शाळेची सहल आज नियोजित वेळेप्रमाणे निघाली . श्रीचे दर्शन घेण्यासाठी आमच्या चार गाड्या तील सर्व विद्यार्थांनी सत्य गणप तीचे दर्शन घेतले .. सहल प्रमुख राजु केंद्रे सर यांनी हजेरी घेतली आणि गाडी सुरू झाली . आज 3 जानेवारी प्रार्थना आणि पसायदान घेऊन विद्यार्थांना शैक्षणिक वातावरणाची जाणिव व्हावी हिणून मिनी परिपाठ झाला . नंतर माता सावित्री बाई फुले यांची जयंती असल्याने सहिलीच्या गाडीमध्येच साजरी केली . सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुमित राठोड व प्राची जाधव या चिमुकल्यांनी भाषणे केली .
दरम्यान काही विद्यार्थांनी सहलीत नेहमी घडते त्याप्रमाणे उलट्या केल्या कुणाच ऐके तर कुणाची मळमळी तर कुणाला गॅस . आमच्या खिचडीचा गिरजा मावशीनी एका मुलीला जवळ घेऊन झेंडूबाब लावला जणू पोटच्या लेकी प्रमाणे काळजी घेतली जणू आमची गिरजा मावशी म्हणजे माता सावित्री बाईच वाटल्या . आणि सहस्त्रकुंड आलेच
सहस्त्रकुंड धबधबा पाहण्याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला तिथे असणारे प्रसिद्ध महादेवाचे मंदिर महादेवाचे दर्शन आणि सहस्त्रकुंड धबधबा पाहण्याचं टावर आहे त्यावरून विद्यार्थ्यांनी या सहस्त्रकुंड धबधब्याचे निरीक्षण केलं ‘. जमेल तशी माहिती विदयार्थांना दिली . फोटो काढण्याचा आनंद घेतला . विद्यार्थासोबत विद्यार्थी होता आल याचा मात्र आनंद भन्नाटच होता .बाजूला असलेल्या निसर्गरम्य रोपवाटिकेमध्ये सर्वां सोबत विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला . जणू एकाच कुटुंबातील सोबती वाटत होते सर्वांनी मिळून मिसळून जेवण केले . सर्व शिक्षकांनीपण एकत्र बसून वनभोजन केले शिक्षक विद्यार्थी अशा प्रकारे वनभोजन झाले . सहल प्रमुख आर एस केंद्रे सरांनी आईसक्रीम खाऊ घातला त्यानंतर जवळपास साडेबाराच्या सुमारास आम्ही माहूर कडे रवाना होत आहोत .
शब्दाकंन
दिगांबर वाघमारे , मुख्याध्यापक
महात्मा फुले प्राथमिक शाळा व विद्यालय संभाजीनगर नवामोंढा कंधार
शाळेची शैक्षणिक सहल आज दि.३ जानेवारी २०२५
(सहस्त्रकुंड धबधबा इस्लापूर, रेणूका माता, दत्तगड, अनुसया माता माहुर )
#महात्मा_फुले_प्राथमिक_शाळा_कंधार
#Mahatma_phule_primary_school_Kandhar
#Mahatma_phule #Digambar_Waghmare #दिगांबर_वाघमारे