भारत स्काऊट -गाईड फिल्म फेस्टीवल;भारत स्काऊट आणि गाईड राष्ट्रीय कार्यालय दिल्लीच्या वतीने “बी.एस.जी. फिल्म फेस्टीवल “चे आयोजन

सातारा ;

स्काऊट-गाईड चळवळ आणि तरुण स्काऊट – गाईड यांचे कार्य ‘उत्तम जगाच्या निर्मितीसाठी’ सदैव चालूच आहे. हे कार्य संपूर्ण जगासमोर प्रदर्शित करण्यासाठी ‘बी.एस.जी फिल्म फेस्टीवल ‘ १८ वर्ष वयावरील सर्व तरुण भारतीयांसाठी प्रवेश मुक्त आहे. प्रथमच भारत स्काऊट आणि गाईड अशा प्रकारच्या फेस्टीवल चे आयोजन करत आहे .

या फिल्म फेस्टीवल सहभागाच्या दोन कॅटॅगरी सांगितलेल्या आहेत. १) शॉर्ट फिल्म- समुदाय सेवाकार्य , समुदाय विकास कार्यक्रम आणि शाश्वत विकासाची ध्येय . (२) डॉक्युमेंटरी- स्काऊट-गाईड कौशल्य व उपक्रमावर आधारीत. व्हीडीओ तयार करून दि.१५ /१२/ २०२० पर्यंत सोबत दिलेल्या गुगलफॉर्म सह पाठविणे आहे. गुगल फॉर्म लिंक:- https://forms.g/e/aU52WHZfono32LPHA तरुण आणि नवोदितांसाठी ही एक उत्तम संधी आहे. तसेच शिक्षक – शिक्षिका यांनी या मध्ये आवर्जून सहभाग घ्यावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्य) तथा जिल्हा मुख्य आयुक्त श्री. राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *