कंधार ; प्रतिनिधी
मनोविकास शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष तथा कंधार शहरातील जेष्ठ विधिज्ञ कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ट नेते ॲड.श्री.बाबूरावजी पुलकुंडवार यांचे दि.16/1/2025 रोजी रात्री 11:00 वाजता हृदय विकाराच्या तीव्रधक्याने निधन झाले आहे.ॲड.बाबूरावजी पुलकुंडवार यांचा पार्थीवावर आज(17/01/2025) रोजी दुपारी ठीक 04:00 वाजता मौजे बहादरपुरा ता कंधार येथील स्मशानभूमी येथे अत्यंविधी होणार आहे .
कै.अॅड.श्री.बाबूरावजी पुलकुंडवार हे कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते होते त्यांनी आपल्या कार्यकिदीत अनेक मानाचे पद भुषविले होते .यांच्या पश्चात मुले , मुली ,नातू नातवंड असो मोठा परिवार आहे .ते डॉ. चंद्रकांतजी पुलकुंडवार (भाप्रसे), विभागीय आयुक्त पुणे यांचे काका व मनोविकास पतसंस्थेचे चेअरमन संग्राम पुलकुंडवार यांचे वडील होत .