कंधार ; कंधार शहरासह तालुक्यात व जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थांना डान्सचे तंत्रशुद्ध पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने शिक्षण देणारे कंधारचे भुमिपुत्र दयानंद मल्हारराव वाघमारे यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रसिद्ध सिनेभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते आज दि १९ जानेवारी रोजी अहमदपूर येथे सत्कार करण्यात आला .
किलबिल इंटरनॅशनल स्कूल अहमदपूर येथे आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी सुप्रसिद्ध सिनेभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. श्री भोसले सर यांचे आभार मानले .
#schoolgathering #feleciate #proud #chalahawayeudya #bharatganeahpure