१६ व्या शतकात इटालियन आर्टिस्ट लियनार्दों-द-विंची या जगप्रसिद्ध चित्रकाराने मोनालीसाचे चित्र काढतांना चेहर्यावर स्मित हास्य, बोलके डोळे अन् चेहर्यावर ठळक रक्तवाहिन्या आपल्या कलाविष्कारतून एका २१”रुंद आणि ३०”आकाराचे पोट्रेट निर्माण केले.ते चित्र अजरामर झाले.यंदाच्या प्रयागराज येथे १४४ वर्षाने येणाऱ्या महाकुंभ मेळ्यात ब्राऊन ब्यूटी म्हणून प्रसिद्धी मिळवलेली निळ्याशार डोळ्यांच्या मोनालीसाला नैसर्गिक सौंदर्य भरभरुन मिळाले. ती माळा,रुद्राक्ष माळा कुंभमेळ्यात विकून आपली उपजिवीका करणारी सौंदर्यवती कुंभमेळ्यात साधु,साध्वी,ऋषी,मुनी यांच्या सहित करोड भक्तगणांची मांदियाळी प्रयागराज नगरी जमली.पण आकर्षण ठरली ती घाऱ्या नेत्रांची,निश्छल हस्याने गर्भश्रीमंत मोनालीसा ठरली आहे.१६ शतकातील लियनार्दो दा विंचीच्ये कलाविष्काराने साकरलेली मोनालीसा आणि सध्याच्या अधुनिक युगात प्रयागराज नगरीतील महाकुंभात माळा विकणारी मोनालीसा या दोघातील तुलना करणारे कंधारी आग्याबोंड गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा ता.कंधार यांनी तुलनात्मक वेध आहे.
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार