सोमठाणा येथिल संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात ” बच्चा कंपणीने लुटला आनंद नगरीचा आनंद ” तर स्वयंशासन दिनी चालवली एक दिवस शाळा

 

(कंधार ; दिगांबर वाघमारे )

तालुक्यातील सोमठाणा येथिल संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात आनंदनगरी कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थीनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला . विविध पदार्थांची मेजवाणी मजा चाखण्याची संधी ग्रामिण भागातील बच्चा कंपनीला या आनंदनगरी उपक्रमातून मिळाली असे प्रतिपादन माजी सरपंच बालाजी गित्ते यांनी आनंदनगरी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून केले . विद्यार्थांनी एक दिवस शाळा चालवून स्वयंशासन दिन स्कुल डे साजरा केला अशी माहिती मुख्याध्यापक धोंडीबा नागरगोजे यांनी दिली .

ग्रामिण भागात ज्ञानाचा वटवृक्ष उभारण गोर गरीबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा डी एन केंद्रे साहेब व सचित चेतनभाऊ केंद्रे साहेब यांनी सोमठाणा तालुका कंधार येथे सुरू केलेल्या संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते .

या वर्षीही प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .त्याचाच भाग म्हणून संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा ता. कंधार या शाळेत “आनंद नगरी”कार्यक्रमाची सुरुवात माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ फोडून माजी सरपंच बालाजी गित्ते व शाळेचे मुख्याध्यापक धोंडीबा नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थांनी गणितातील नफा तोटा व आर्थिक व्यवहार वाबत ज्ञान घेतले .

दरम्यान शाळेत कुस्ती,क्रिकेट ,चित्रकला , गितगायन यासह अनेक कार्यक्रम राबविण्यात आली . तसेच स्कुलडे स्वयंशासन दिन ही साजरा करण्यात आला. यामध्ये कृष्णा तिरुपती गित्ते यांनी मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले तर उपमुख्याध्यापक मनीषा राठोड, लिपिक ज्ञानेश्वर कागणे ,सहशिक्षक ओमकार गित्ते, नंदनी बेंद्रीकर,सृष्टी जाधव,श्रद्धा जाधव,माहेश्वरी चाटे,मनीषा अशोक राठोड,अश्विनी वाघमारे,आधिनाथ गायकवाड तर सेवक म्हणून माऊलीराज गित्ते,ज्ञानेश्वर जाधव यांनी काम पाहिले.

सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली मुख्याध्यापक कृष्णा गित्ते व सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी अध्यक्षीय भाषणातून शाळेचे मुख्याध्यापक धोंडीबा नागरगोजे यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देत कौतूक केले .यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *