Post Views: 53
कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून या दिवशी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाते. तथापि, दि. २५ जानेवारी, २०२५ रोजी शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे दि. २४ जानेवारी, २०२५ रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात यावी. असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. यामुळे राज्यामध्ये आपल्या अधिपत्याखालील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सर्व अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम दि. २४ जानेवारी, २०२५ रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे आयोजित करण्यात आला.
त्यानिमित्ताने, राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा “आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परपरांचे जतन करु आणि मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.” अशी प्रतिज्ञा सोनू दरेगावकर यांनी वाचन केली. व जात पडताळणी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी,
पोलीस निरीक्षक श्री. विजय कुरील, मुकुंद मूळे, सिद्राम रणभिरकर, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, बाबू कांबळे, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, निलेश वायकोस, राजेश मेथेवाड, रोहन देशमुख, अनिकेत वाघमारे यांच्यासह कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.