नांदेड ; प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलभोसी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध क्रिडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, आनंद नगरी, सांस्कृतीक कार्यक्रम इ चे आयोजन करण्यात आले असून दि.23.12.2024 रोजी विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.
केंद्रप्रमुख श्री पी.एस. मुंढे, शा.व्य.समितीचे अध्यक्ष विलास सोनकांबळे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
यावेळी शिक्षण समितीचे सदस्य, पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रयोगाचे सादरीकरणामध्ये ईश्वर कैलास सोनकांबळे, शिवम संजय वरपडे ( हवेचा दाब ), परशुराम नागनाथ वरपडे ( ऑक्सीजन ज्वलनास मदत करतो ), हुजेर पाशा शेख ( उष्णतेमुळे वायूचे प्रसरण होते.), आरती कैलास किडे ( ज्वालामुखी), प्रतिभा शाम किडे ( नाचणारा फुगा), स्वराली गजानन केशे ( कार्बन डाय-ऑक्साइड ज्वलनास प्रतिरोध करतो ), शिवाजी राम रंडाळे ( पाणी उष्णता शोषून घेते ), अजय संजय कांबळे ( हवेला वजन असते.), सुप्रिया संजय तेलंगे ( पाण्याचा पृष्ठीय ताण कमी करणे ), सई देविदास वरपडे ( हळदी पाण्याचा रंग बदलणे), आराध्या विजयकुमार वरपडे ( पाण्याची घनता ), रोहिणी रमाकांत किडे, कोमल कैलास सोनकांबळे ( अंधश्रद्धा निर्मूलन), दिनेश संतोष वरपडे ( नेल पेंट पाण्यावर तरंगणारा ज्वलनशील पदार्थ ), शुभम विठ्ठल वरपडे ( आधुनिक कचराकुंडी ), प्राची गोविंद वरपडे, मयुरी योगेश लुंगारे ( हवेचा दाब), वेदांत रामेश्वर वरपडे ( धूम्रपानामुळे शरीराचे होणारे नुकसान ), अनिकेत शरद तेलंगे ( विद्युत घंटा ), कृष्णा कालिदास केशे ( हवेच्या दाबामुळे चालणारी कार ), आरती पिराजी वरपडे (हवेचा उर्ध्वमुखी दाब), पूजा दिलीप तेलंगे ( मॅजिक फ्लावर ), प्रतीक्षा निळकंठ आसेगावकर ( पाण्याची घनता ), प्रतीक्षा बालाजी वरपडे ( हवेला वजन असते ), श्रुती बालाजी वरपडे ( हृदयाचे स्पंदन ) यांनी सहभाग नोंदवला.
प्रदर्शनात भेट देण्यासाठी माता पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी सहशिक्षक श्री उद्धव सूर्यवंशी, मन्मथ पांडागळे, बालाजी बेटमोगरेकर, सविता मुदखेडे व मुख्याध्यापक बळवंत मंगनाळे यांनी परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित केंद्रप्रमुख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य व पालकांनी सदरील बाल वैज्ञानिकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.