प्रजासत्ताक दिनानिमित्त संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा येथे विविध कार्यक्रम

कंधार ; प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनानिमित्त संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय सोमठाणा या शाळेत संस्थेचे सचिव मा श्री चेतन भाऊ केंद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा परिसरात देशभक्ती गितानी व भारत मातेच्या जयजयकारांनी दुमदुमला होता .

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मागील आठवड्यापासून शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून क्रीडा स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,आनंदनगरी, भाषण स्पर्धा,स्वयंशासन दिन,कुस्ती स्पर्धा असे विविध उपक्रम घेण्यात आले.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप स्पर्धा निर्माण झाली होती.लेझीम पथकानी देशभक्ती गीतावर सादरीकरण केले या विविध स्पर्धामधुन प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव श्री चेतन भाऊ केंद्रे साहेब होते व प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शंकर पाटील गित्ते,उपसरपंच बालाजी पाटील गित्ते,पोलीस पाटील संग्राम पाटील गित्ते होते वरील मान्यवरांच्या व शाळेचे मुख्याध्यापक श्री नागरगोजे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले .

अध्यक्षीय समारोपात सचिव मा श्री चेतन भाऊ केंद्रे साहेबांनी मुख्याध्यापक नागरगोजे आणि शाळेतील सर्व कर्मचारी वर्गाचे तोंडभरून कौतुक केले व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *