नांदेड प्रतिनिधी:- दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी मुदखेड येथे संपन्न झालेल्या सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाचे चौथे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनात सौ. रूचिरा बेटकर यांना मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान, उमरी यांच्या तर्फे माता अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या सातत्यपूर्ण संवेदनशील लेखनाची आणि साहित्यिक चळवळीतील योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. या संमेलनाचे उद्घाटन म्हणून उपस्थित असलेल्या माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण, संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जगदीश कदम, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष प्रवीण गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था मुदखेड व सप्तरंगी साहित्य मंडळ, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रणछोडदास मंगल कार्यालयात संपन्न झाला आहे.