@देश हिताय

 

26 जानेवारी 2025 रोजी आपला भारत 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.
आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र झाला परंतु आपला देश कसा चालवावा कारभार करताना कोणते कायदे असावित यासाठी घटना समिती नेमण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या घटनेस मान्यता देण्यात आली. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली.यालाच संविधान असे म्हणतात.
या संविधान निर्मितीमध्ये मोलाचे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले, म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते. भारतीय घटनेत सर्वांना न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मानवी मूल्याबरोबर हक्क व कर्तव्य यांची बीजारोपण केले आहे.आपण आपल्या हक्कासाठी जेवढे जागरूक राहतो तेवढे कर्तव्यासाठी राहत नाही.
” हम न सोचे हमे क्या मिला हैं
हम ये सोचे किया क्या है अर्पण”
मला काय मिळाले? यापेक्षा मी देशाला काय दिले हे महत्त्वाचे आज खरच आपणाला स्वातंत्र्य मिळाले आहे असे वाटते का? आजही अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्या सतावत आहेत. “आपलीच माणसे आपलीच माती करत आहेत’ धोरणे लादण्यामुळे विकास होत नाही,तर पर्यावरणाचा विनाश होत आहे. माणूस मारून कोणता विकास करतोय आपण? कोरोनामुळे मागिल दोन-तीन वर्षापूर्वी ऑक्सिजनच्या श्वासापायी अनेकांनी तडफडून जीव सोडला. एका सूक्ष्मजीवाने बलाढ्य मानवी समुदायाला असा काही धक्का आणि धोका दिला की आजही आठवण झाली की काळीज चिरत.
आपल्या देशाच पर्यावरण जपण आणि आपली प्रत्येक कृती ही देशहिताला प्रथम प्राधान्य देणारी ठेवूया . तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने देश प्रजासत्ताक बनेल!

रूचिरा बेटकर, नांदेड′
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *