( कंधार प्रतिनिधी ; संतोष कांबळे )
कंधार येथील जिल्हा परिषद शाळेचा मैदानावर शुक्रवार २४ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची जाहीर सभा व माजी जि.प. सदस्य ॲड. विजय धोंडगे, माजी पं.स. सदस्य डॉ. सुनील धोंडगे, प्रताप धोंडगे, माजी जि.प. सदस्या सौ.संगीता धोंडगे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
पंडित जवाहरलाल नेहरू नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा बहुमान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपमय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था ही सामान्य जनतेचे कामाशी निगडित संस्था आहे त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपेक्षित सामान्य जनतेची कामे करावे. विकसित भारत, विकसित महाराष्ट्रात, विकसित नांदेड आणि विकसित कंधार करण्यासाठी भाजपला साथ द्या असे प्रतिपादन राज्याचे लोकनेते माजी मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
या प्रसंगी ते बोलत होते. या प्रवेश सोहळयात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, भाजपाचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अमरनाथ राजूरकर, चंद्रसेन पाटील, देविदासभाऊ राठोड, ॲड. गंगाप्रसाद यन्नावार, संतोष पांडागळे, बालाजी पांडागळे, सदाशिव अंबुरे, सौ. चित्ररेखा गोरे, भास्कर पा. ढगे, देविदास गीते, भास्कर पाटील जोमेगावकर, भगवान राठोड, व्यंकट गव्हाणे, तुकाराम वारकड, गजानन सूर्यवंशी, डॉ. सौ जयमंगला औरादकर, केरबा बिडवई, शरद पवार, बाळासाहेब गर्जे, सत्यनारायण मानसपुरे, उत्तम चव्हाण
यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. चव्हाण म्हणाले की नांदेड जिल्ह्यामध्ये एकेकाळी भाजपला साथ मिळत नव्हती परंतु काळ बदलला नेतृत्व बदलामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्व नऊ जागा निवडून आणण्यामध्ये आम्हाला यश मिळाले. विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश प्राप्त करण्यात येईल. भाजपची ताकत वाढवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा आदेश चव्हाण यांनी दिला. जो भाजपचा निष्ठावंत आहे त्यांच्या पाठीशी मी शंभर टक्के राहणार आहे. शंकर अण्णा धोंडगे यांना आमदार करण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना त्यांना साथ दिला मी या पुढे धोंडगे बंधूचा पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. प्रत्येक घराघरात जाऊन भाजप सभासद नोंदणीचे कार्य उत्कृष्टपणे करत आहे. लाडक्या बहिणींची साथ महाराष्ट्रात महायुती सरकार स्थापन करण्यासाठी मिळाली आहे. त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ या पुढेही मिळणार आहे. सरकारने जी योजना आणले ती योजना बंद होणार नाही. पंतप्रधान आवास घरकुल योजनेअंतर्गत महाराष्ट्रात २० लाख लाभार्थ्यांना घरकुलांना पहिल्या टप्पा मिळाला आहे. घरकुल योजनेसाठी शिल्लक राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ लवकरच मिळणार आहे. केंद्र शासनाचे व महाराष्ट्र शासनाचे सर्व योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी करावे. कंधार तालुक्यातील भाजप नोंदणी कार्याचे कौतुक खा. चव्हाण यांनी केले.
यावेळी आ.अमर राजूरकर, विजय धोंडगे, डॉ. सुनील धोंडगे, गंगाप्रसाद यन्नावार यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन शंतनु कैलासे यांनी केले.
*कंधार मध्ये भाजपाचा कमळ जोमाने फुलतोय- चव्हाण*
*डॉ.सुनील धोंडगे,ॲड.विजय धोंडगे हे अतिशय संघर्ष करणारे कार्यकर्ते असून,सामान्य माणसांना न्याय देण्यासाठी सतत अग्रेसर असतात,यापुढेही तसेच काम करा! मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी धोंडगे परिवाराला दिले आहे*