पाच दिवशी योग शिबिराचे सांगता
मुखेड: प्रतिनिधी
योग साधनेचा नियमित अभ्यास केल्यास रुग्णालयात जाण्याची गरज नाही. योगामुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील विकास होतो. योगाच्या नियंत्रित हालचाली तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व पैलूंवर आत्म-नियंत्रण कसे प्रदान करायचे हे शिकवतात.
असे प्रतिपादन नांदेड भूषण आदर्श योग शिक्षक पुरस्कार प्राप्त भक्तीयोग समितीचे अध्यक्ष सितारामजी सोनटक्के यांनी केले.
आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या संकल्पनेतून श्रीराम मंदिर प्रथम वर्ष गाठ निमित्त गोविंदराव राठोड सभागृह येथे पाच दिवसीय भव्य योग शिबिरात समारोप प्रसंगी ते बोलत होते. समारोपप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एड. खुशालराव पाटील उमरदरीकर, मेजर डॉ. मधुसूदन चेरेकर, योग शिबिर मार्गदर्शक विठ्ठल कोळनुरे, वीरभद्र महाराज स्वामी, डॉ. वीरभद्र हिमगिरे, तुळशीराम केरले गुरुजी, किशोरसिंह चव्हान, हणमंत नरोटे, वसंत जाधव, प्रकाश जाधव, सुधीर चव्हाण, राजू घोडके, विनोद दंडलवाड, माधव तोटावाड, गजानन अकुलवार, करण रोडगे यांची उपस्थिती होती. सिताराम सोनटक्के गुरुजी पुढे म्हणाले की, नियमितपणे योगा केल्याने मज्जासंस्थेतील अनेक हार्मोन्स स्थिर होतात. हे तुम्हाला अधिक सकारात्मक होण्यास मदत करते आणि तुमचा जीवनाकडे ताजेतवाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याचा कल असतो.
प्रारंभी गुरुवर्य सितारामजी सोनटक्के, केरले गुरुजी, योग मार्गदर्शक विठ्ठल कोळनुरे यांनी चित्तथरारक योग प्रात्यक्षिके दाखवून योगसाधकांची मने जिंकली. दरम्यान योग मार्गदर्शक विठ्ठल कोळनुरे, निळकंठ मोरे, संध्याताई मठदेवरु, आरती पुरे यांनीही योगसाधनेचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास भक्ती लॉन्स नित्ययोग समितीचे सदाशिव बुटले पाटील, प्राचार्य दिलीप माने, मकरंद पांगरकर, किरण मुत्तेपवार, रुखमाजी मुदखेडे, सुरेश गोजे, लक्ष्मीकांत रुद्धे, पंकजआयनीले, अनिल राठोड, रामराव जनकवाडे, राजीव लोखंडे यांची उपस्थिती होती. शिबिराची सांगता महायज्ञ करून झाली. आमदार डॉ. तुषार राठोड यांनी आयोजीलेल्या योग शिबिराबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.