(अतिथी संपादक – दत्तात्रय एमेकर गुरुजी )
वर्षाच्या सुरुवातीस किंवा २६ जानेवारी निमित्य जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात विविध शाळांमध्ये शालेय क्रिडा स्पर्धा व स्नेह संमेलन आयोजित केले जातात.श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळेरोड कंधार या ज्ञानालयाने ३० जागतिक गुराखी साहित्य संमेलनाच्या शोभायात्रेत आणि गुराखीगडावर आपल्या उपक्रमाची छाप पाडून प्रथम येण्याचा बहुमान मिळवणाऱ्या शाळेनी आपला प्रवास सुरु ठेवून दि १ फेब्रुवारी २०२५ रोजी स्नेहसंमेलन आयोजित केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य डाॅ.सुभाषराव नागपूर्णे प्रमुख पाहूणे माजी आमदार व सचिव भाई गुरुनाथराव कुरुडे साहेब,मातोश्री मुक्ताई प्रतिष्ठाण कंधारच्या अध्यक्षा डाॅ.मनिषा पुरुषोत्तम धोंडगे ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव,डाॅ.भगवान जाधव या॔ची उपस्थिती होती.मान्यवरांच्या समर्थ हस्ते प्रतिमा पुजन व दीप प्रज्वलन करून वंदेमातरम राष्ट्रीय गीताने सुरुवात झाली.निवृत्त न्यायाधीश डाॅ.चपळगावकर, मधुकर कुरुडे,सुलोचनाबाई धोंडगे,ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.स्वागत गीत विमल वडजे,गोविंद अन्नकाडे, पायल पांचाळ यांनी उत्तम सादर केले.उपमुख्याध्यापक प्रा.मुरलीधर घोरबांड प्रास्ताविक केले.प्रमुख पदावरुन बोलतांना कविमनाचे पीआय चंद्रकांत जाधव यांनी पालक या नात्याने कन्येवर सुंदर कविता सादर करून उपस्थित पालक वर्गाचे मन जिंकले.विचार मांडताना अधुनिक युगात तरुणाईस व विद्यार्थ्यास आळशी होण्यास मोबाईल जबाबदार अशी खंत व्यक्त केली.कुठल्याही अतिप्रसंग व संकटकाळी पोलीसांना ११२ नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमात विविध स्पर्धा परीक्षेत अन् शालेय क्रिडा स्पर्धेतील यशवंताना बक्षिस वितरण मान्यवरांच्या समर्थ हस्ते करण्यात आले.नंतर सांस्कृतिक कार्यक्रमास परंपर बाजूला ठेवत शिवप्रभूंना आरतीतून अराधना करुन सुरुवात झाली.कार्यक्रमाचे आकर्षण वैदु समाजातील हुबेहूब भगीनींची भुमिका गीतातून सादर करत श्रेया विजय सातापूरे या चिमुकलीने रसिक मायबापांची मने जिंकली.तत्कालीन आमदार डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब,पंचायत समिती सभापती भाई गुरुनाथराव कुरुडे,नगराध्यक्ष भाई राजेश्वरराव आंबटवाड यांनी वैदुकाॅलनी महाराष्ट्रात एकमेव निर्माण केली.म्हणून भाई कुरुडे साहेब यांचे हस्ते श्रेयाचा सत्कार करण्यात आला.एकुण ३५ गीतातून,एक नाटीका विशेष म्हणजे माध्यमिक उर्दु विभागातील ९ वी आणि १० वी वर्गातील मुलींनी देशभक्ती गीतावर सुंदर नृत्य करत आपला कलाविष्कार गुराखी नृत्य पिठावर सादर केला.भाग शाळा बहाद्दरपूरा या भाग शाळेची चार गीत सादर केली
या कार्यक्रमात शालेय समिती अध्यक्षा प्रा.लिलाताई आंबटवाड,मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड, उपमुख्याध्यापक प्रा.मुरलीधर घोरबांड,पर्यवेक्षक सुरेश ईरलवाड,भागशाळा प्रमुख ठाकूर, उर्दू विभाग प्रमुख ए.एल.सरवरी सर,ज्युनियर काॅलेज मराठी व उर्दु प्रा.अशोक वरपडे व प्रा.हिदायत बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.सांस्कृतिक कार्यक्रमास कानिंदे,धोंडगे,चिंतेवार,नाईक,वडजे,प्रा. उबाळे,प्रा.पवार/राठोड,प्रा.डांगे,प्रा.फड आदींनी परिश्रम घेतले.अजहर बेग,वैभव कुरुडे,ऐनोद्दीन,आकुलवाड,प्रशांत कलमे,तोटवाड,संग्राम जाधव,चोकले,जाधव,पटणे,आदींनी परिश्रम घेतले.उत्कृष्ट सुत्रसंचलन प्रा.भगवान बामणे व प्रा.विद्याताई फड या व्दयांनी करुन उपस्थितांची मने जिंकली.