(कंधार ; दिगांबर वाघमारे )
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानशेवडी येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माता पालक मेळावा व हळदी कुंकू हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्षा सौ मनिषा भालेराव व अध्यक्ष अनिल मोरे यांच्या पत्नी सौ सोनाबाई मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.शाळेत माता पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमातून महिलांना मार्गदर्शन करून प्रबोधन मुख्याध्यापिका सौ निलीमा यंबल शहापुरे यांचा पुढाकाराने करण्यात आले .
हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामिण भागांतील महिलांना आरोग्य विषयक माहिती तसेच अंधश्रद्धा आणि शिक्षणाचे महत्व प्रभाविपणे राबविता येईल म्हणून मुख्याध्यापिका सौ निलीमा यंबल शहापुरे आणि त्यांचा सहकारी शिक्षकांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते .हळदी कुंकू व पालक मेळावा उत्साहात पार पडला यावेळी उपस्थित स्त्रियांना हळदीकुंकू देऊन सन्मान करण्यात आला . कार्यक्रमात महिला चे विविध खेळ घेण्यात आले महिलांनी अतीशय उत्साहात सहभाग नोंदवला कार्यक्रम अतीशय उत्साहात संपन्न झाला .
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती चे सदस्या सौ लक्ष्मीबाई डुबुकवाड,सौ कविता मोरे , सौ अनिता मोरे ,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निलीमा यंबल शहापुरे,सह शिक्षीका सौ हिमटे मनिषा,सौ अगरकर सोनाली, युवा प्रशिक्षणार्थी श्रीमती स्मिता ढवळे, गावातील महिला भगिनी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.