मुखेड: दादाराव आगलावे
येथील जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आर्य वैश्य महासभेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान जोशी इन्फोटेकच्या सभागृहात नुकताच करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.अशोक कौरवार होते. जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वर्षभरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून नुकतीच आर्य वैश्य महासभेच्या राज्य उपाध्यक्षपदी नंदकुमार मडगुलवार यांची तर राज्य कार्यकारणी सदस्यपदी सुप्रसिद्ध उद्योजक राम पत्तेवार व विठ्ठल उर्फ विलास कोडगिरे, यांची तसेच कैट संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी उत्तम आण्णा चौधरी यांची व आर्य वैश्य जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी प्रमोद पाटील चिद्रावार यांची निवड झाल्याबद्दल यावेळी जिप्सी मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रारंभी सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उत्तम आण्णा चौधरी, विलास कोडगिरे, प्रमोद पाटील, जिप्सीचे कार्याध्यक्ष बलभीम शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. अशोक कौरवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष जय जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन बालाजी तलवारे यांनी केले तर दादाराव आगलावे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास वैजनाथ दमकोंडवार, सुरेश उत्तरवार, उत्तम अमृतवार, हनुमंत गुंडावार, राजेश भागवतकर, उमाकांत डांगे, गोविंद पाटील, सुरेंद्र गादेकर, आकाश पोतदार, विठ्ठल मोरे, सागर चौधरी, श्रीकांत घोगरे, गजानन मेहकर, बालाजी वडजे, नामदेव श्रीमंगले, साईनाथ कोत्तापल्ले, रामदास सुंकेवार, जयप्रकाश चौहान, माधव गुंडावार, विठ्ठल बिडवई, अरुण पत्तेवार, योगेश पाळेकर, संजय कोडगिरे, अविनाश जोशी, केदार पाटील, भार्गव जोशीसह जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.