मांगदरी येथे विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांची प्रक्षेत्र भेट

अहमदपूर ( प्रतिनिधी ) आज दिनांक 30/01/2025 रोजी मोजे मांगदरी ता.अहमदपूर येथे श्री राम बसवंत घोटे यांच्या शेतावर आज साहेबराव दिवेकर, विभागीय कृषी सहसंचालक लातूर यांची प्रक्षेत्र भेट झाली. प्रक्षेत्र भेटीदरम्यान मांगदरी येथील भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतील क्षेत्राची पाहणी केली. घोटे यांनी खडकाळ व माळरान जमिनीवर पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या क्षेत्रावर आठ हेक्टर क्षेत्र केशर आंबा अतीघन लागवड करून आज शेतकऱ्यासमोर एक नवीन उपक्रम राबवला आहे. या ठिकाणी लिंबोटी येथील दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाईपलाईन करून स्वतःची तीन शेततळी, एक विहीर पाण्याचे साधन म्हणून अत्याधुनिक जलसिंचनाचे ठिबक आणि तंत्रज्ञान वापरत आहेत. सेंद्रिय शेतीसोबत फळ पिकात सेंद्रिय शेती संकल्पना ही करत आहेत.

शेणखत सलरी जीवामृत यासोबत सेंद्रिय खते देण्यासाठी स्वतंत्र सेंद्रिय खतपुरवठा फिल्टर बसविले आहे .यासोबत हा भाग 41 अंश ते 45 अंश दरम्यान तापमानाचा असून यामध्ये फळबागेत उन्हाळ्यात उष्णतेचा ताण बसू नये म्हणून मोहगणी आणि मिलिया डुबिया चा वापर आंतरपीक म्हणुन फळांची उच्यप्रत वाढविण्यासाठी सावली आणि बाग चांगल्या पद्धतीने जोपासण्यासाठी या ठिकाणी अवलंब केला आहे. जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत फळबाग लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. PMFE या योजनेत लघुउद्योग पूरक व्यवसाय शेतकऱ्यांनी सुरु करावे अशी सूचना दिली. यावेळी सचिन बावगे, तालुका कृषी अधिकारी अहमदपूर यांनी तालुक्यामध्ये क्षेत्र वाढवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत असून अधिक क्षेत्र वाढवून अहमदपूर तालुक्यात फळ पिका क्षेत्रासोबत फळांचे प्रक्रिया उद्योग वाढविण्यासाठी सर्व क्षेत्रीय कर्मचारी काम करत आहेत असे सांगितले.

घोटे यांच्या शेतीला भेट शेतकऱ्यांनी देऊन आर्थिक उन्नती करण्यासाठी फळबाग लागवड करावी असे आव्हान केले . यावेळी मंडळ कृषी अधिकारी अशोक सोळंके , कृषी सहाय्यक सचिन शेळके, मुरलीधर भारती, माधव बोयनर, हनुमंत टोकले, शेतकरी संतोष गिरी, परमेश्वर देवकते आणि विठ्ठलराव श्रीरामे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *