अहमदपूर दि.03.02.25 टागोर शिक्षण समिती अंतर्गत चालणाऱ्या यशवंत विद्यालयाच्या मुख्य लिपिक पदी पदोन्नतीने श्री राजेंद्र सूर्यवंशी यांची व त्या रिक्त झालेल्या जागेवर वरिष्ठ लिपिक पदी जयप्रकाश माने यांची नियुक्ती करण्यात आली.
या निवडीबद्दल या दोघांचा प्राचार्य गजानन शिंदे, जिल्हा परिषदेचे लेखा अधिकारी वसंत जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व ग्रंथ देऊन देऊन सन्मान करण्यात आला.
या निवडीबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र पैके, सहसचिव प्रा. डॉक्टर सुनीताताई चवळे, उप मुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्या सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.