(मुखेड: दादाराव आगलावे )
येथून जवळच असलेल्या श्री संत नामदेव महाराज सार्वजनिक वाचनालय पांडुर्णी येथे स्व. गंगाबाई दगडोजी सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ रांगोळी स्पर्धा तर स्व. दगडोजी पाटील सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. रांगोळी स्पर्धेत कु.मनीषा व्यंकट देवकते प्रथम, कु. वैष्णवी दिगंबर कोंकेवाड द्वितीय तर कु.माधुरी उत्तमराव सूर्यवंशी ही सर्व तृतीया आली. वक्तृत्व स्पर्धेत कु. संचिता शशिकांत सूर्यवंशी प्रथम, कु.रागिनी कालिदास श्रीरामे द्वितीय तर कु.तनवी प्रकाश लोहबंदे ही सर्व तृतीय आली. जि.प. प्राथमिक शाळा पांडुर्णीचे मुख्याध्यापक एस. बी. डुबरे यांच्या पुढाकारातून सदरील स्पर्श स्पर्धा घेण्यात आल्या.
बक्षीस वितरण मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमासाठी सरपंच सौ. विमलबाई भागवत किनवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रीराम पाटील पांडुर्णीकर, वाचनालयाचे अध्यक्ष दादाराव पाटील पांडुर्णीकर, पंडितराव वडजे, माधवराव वडजे, मोहन पाटील तांंदळीकर, प्रभाकर सूर्यवंश, पी.जी. मदने, पी.पी. शेलार, शंकरराव श्रीरामे, सौ. बेलेबाई, सौ. सुरेखा सूर्यवंशी, सौ. मुक्ताबाई श्रीरामे, प्रभाकर सूर्यवंशी, सौरभ सूर्यवंशी, दिगंबर कुणकेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.