कंधार (विशेष प्रतिनिधी डॉ.प्रदीपसिंह राजपूत )
कंधार तालुक्यातील पांगरा येथील मनोकामना पूर्ण करणारे महादेव मंदिर हे पंक्रोशीतील भाविक भक्ताचे आकर्षण ठरत असून आंबीली बारस च्या दिवशी होणाऱ्या सोहळ्या ची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
जसा जसा महाशिवरात्री चा मास जवळ येत आहे, तसे तसे पांगरा येथील या हेमांडपंथी महादेव मंदिराकडे भक्तांचा ओघ वाढत असून
सात दिवस चालणाऱ्या सप्ताह मध्ये सात दिवस आपल्याला त्या मंदिरात राहता यावे व आपला संकल्प, नवस, मनोकामना पूर्ण करता यावी यासाठी आतापासूनच नियोजन करतांना दिसत आहे, कारण पांगरा येथील या हेमांडपंथी मंदिरातच सात दिवस मुक्कामी राहावे लागते व केवळ घरचे अन्न पाणी प्राशन करूनच येथे राहावे लागते, सप्ताह, काल्याचे किर्तन, महादेव काठीची मिरवणूक, महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित केले जातात.नांदेड हून उस्माननगर, भापोळवाडी मार्गे कंधार कडे येतांना
हायवे वरच पांगरा स्टॉप असून पूर्व दिशेला १०० मीटर वरच हे प्राचीन काळातील हेमांडपंथी, बळी सिद्धेश्वर महादेवाचे देवस्थान आहे. अलीकडच्या काळात याच परिसरात विठ्ठल रुख्मिणी व साईबाबा चे असे दोन नवीन मंदिर सुद्धा उभारण्यात आले आहेत.