(कंधार ; दिगांबर वाघमारे )
कलशारोहन सोहळा निमित्त १०८ कुंडी विष्णुयाग महायज्ञ श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह कथा प्रारंभ दिनांक 27 फेब्रुवारी ते 06 मार्च 2025 या कालावधीत अंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते प.प.श्री देवकीनंदनजी ठाकुर महाराज (श्री क्षेत्र वृंदावन धाम यांचे होणार आहे .
कथा वेळ : दुपारी 01 ते 04 असून कथा स्थळ :श्री क्षेत्र उमरज (धाकटे पंढरपुर) येथे होणार आहे .श्रीक्षेत्र उमरज येथे भरणार जनू भक्तांचा कुंभमेळा……
त्रिवेणी संगमाचा योग….
श्रीमद् भागवत…. कलशारोहण…. अखंड हरिनाम असा होणार आहे सर्व पंचक्रोशीतील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन
श्री संत महंत एकनाथ गुरु नामदेव महाराज मठाधिपती श्री संत नामदेव महाराज संस्थान उमरज यांनी केले आहे .
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असणारे श्री संत नामदेव महाराज देवस्थान श्री क्षेत्र उमरज येथे दिनांक २७फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान होणा-या अंखड हरीनाम सप्ताह सह श्रीमद् भागवत कथा १०८कुंडी विष्णूयाग महायज्ञ व कलशारोहण ,कार्यक्रमाचे दिनांक २ फेब्रुवारी रोजी ध्वजपुजन व कथामंडप भुमिपुजन मठाधीपती एकनाथ गुरु नामदेव महाराज यांच्या शुभहस्ते आमदार प्रतापराव पाटिल चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले .
याच पार्श्वभूमीवर आमदार चिखलीकर यांनी नांदेड जिल्हाअधिकारी ,पोलीस अधीक्षक ,मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या सह कंधार लोहा तालुक्यातील सर्व विभागाच्या आधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.दिनांक 2 फेब्रुवारी रोजी श्री क्षेञ उमरज येथे आमदार चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दररोज किमान १ लाख व दिनांक ४ मार्च रोजी कलशारोहण कार्यक्रमाला ३ लाख भाविकभक्त उपस्थितीत राहतील असा अदांज मठाधीपती एकनाथ महाराज यांनी वर्तवीला यास अनुसरुन भाविकांसाठी सुरक्षा बंदोबस्त ,आरोग्य ,पिण्याचे पाणी , विद्युत पुरवठा ,बस वाहतूक ,कार्यक्रमाची जागा,पार्कींग व्यवस्या ,स्वच्छता ,आग्नीशामक व्यवस्था आदि विषयावर संबधीत अधिकारी यांच्या सोबत आमदार चिखलीकर यांनी सविस्तर चर्चा करुन आढावा घेतला व त्याची तुरंत पुर्तता करण्याच्या सुचना संबधीतांना दिल्या .
यावेळी प्रमुख उपस्थिती ,जिल्हाधिकारी अभिजित राउत, पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी जगताप ,जिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख व इतर सर्व जिल्हा व तालुका अधिकारी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरीक व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.