(कंधार ; दिगांबर वाघमारे )
नन्हा मुन्हा राही हू देश का शिपाई हू या गितातून राष्ट्रप्रेम,देश रंगीला रंगीला यातून देशातील चालीरिती परंपरा यातील विविधता, देशाचे सैन्य किती भक्कम आणि शक्तीशाली आहे दाखवणारे जलवा जलवा,यासह देशभुक्ती गीतातून देशाभिमान जागृत करत विर जवानांना स्मरण करून,वृक्षारोपन,वृद्धाश्रम , सावित्रीबाई फुले या नाटिकेतून समाज प्रबोधन करत कंधार च्या प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळेत विविध गुणदर्शनाच्या सांस्कृतिक कार्यक्रला चिमुकल्या बाल कलाकारांनी भरभरून प्रतिसाद दिला .
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने कंधार येथील प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळेत दि १ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक म्हणून संस्था सचिव विश्वेश्वर पापीनवार,तर प्रमुख पाहुणे म्हणून ,शैलेश मामडे , मुख्याध्यापक भास्कर पाटील कळकेकर ,डॉ.सौ.मिनाक्षी सादलापुरे,बसवेश्वर मंगनाळे,हरीहर चिवडे,राजहंस शहापुरे , दिगांबर वाघमारे,मंजूर अहेमद,महमंद अनसारोदीन, विरभद्र बेल्लुरे ,पत्रकार एकनाथ तिडके ,श्रीमती औरादकर , श्रीमती रत्नमाला सुधारकर झरकर( बारड) ,विनायक गोंड आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची प्रास्ताविकातून शिक्षिका शिल्पा उपरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव विश्वेश्वर पापीनवार यांनी मार्गदशन करताना आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी सर्वगुण संपन्न असणे आवश्यक असून बालवयात शाळामधून झालेले संस्कार जिवनात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरतात असे सांगून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतूक केले .
नगरेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे संपन्न झालेला कार्यक्रम जवळपास चार तास चालला .यामध्ये मराठी लावण्या , हिंदी गाणे,लोकगित ,धार्मिक गित ,पोवाडे यासह बाल नाटीका ,चिटकुले याचे सादरीकरण विद्यार्थांनी केले.कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन शिक्षिका अश्विनी गोंड ,यांनी तर आभार वैशाली धनपलवार यांनी मानले,शाळेतील जेष्ठ शिक्षिका सुशिला वारघडे ,आराधना बडजाते , आणि शिक्षक व्यंकटेश ताटे,पुष्पा चिंतेवार ,मिनाक्षी कांबळे ,सौ पुजा औसेकर यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने झाली .