मुखेड: (दादाराव आगलावे)
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्नित असलेल्या मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाने मागील काळात अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजात एक नवा प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्या सामाजिक कार्याची माहिती सेलू (जि. परभणी) येथे आयोजित पत्रकारांचे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वास्त एस. एम. देशमुख यांना दिली असून तालुका पत्रकार संघाचे उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे.
आगामी काळात अश्या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी मुंबई पत्रकार परिषद आपल्या संघाच्या पाठीशी खणभिरपने असल्याचे सांगितले. मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाने मागील पाच ते सहा वर्षापासून पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर तज्ञ डॉक्टर मंडळीच्या उपस्थितीत आयोजित केले. ह्या शिबिरात सर्व शारीरिक चाचण्या करण्यात येत असतात त्यातून अनेक पत्रकार बांधवांचे आजराचे निदान झाले आहे तर ज्येष्ठ पत्रकार राजेश बंडे या पत्रकार बांधवाचे हृद्य रोगाचे तात्काळ निदान झाल्याने पुढील धोका टळला. मागील काळात पत्रकाराचे आरोग्य सुरक्षासाठी कोव्हिड सुरक्षा कवच म्हणून पत्रकारांचा आरोग्य विमा उतरविण्यात आला. सर्वसामान्य नागरिक थंडीने अतोनात होणार त्रास पाहून आर्थिक दृष्ट दुर्बल घटकातील नागरिकांना महिलांना उबदार रगाचे वाटप करण्यात आले व मायेची उब देण्यात आली आहे. आरोग्य तपासणी शिबिर मोफत औषध वाटप यासह शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थांना मदत केली जाते तर अपंग मूकबधिर मतिमंद विद्यालयात विद्यार्थांना शैक्षणिक साहित्यासह फळे वाटप असे उपक्रम राबवितात. यासोबतच वृक्ष लागवड व संगोपन पिण्याच्या पाण्याचे पांणपोयी, रक्तदान शिबरात समजिक संस्था सोबत सक्रिय सहभाग संयुक्तिक रीत्या घेतला जात आहे. जांब (बु.) येथे एका शॉक लागलेल्या व्यक्ती चे कुटुंबांना आर्थिक मदत केली गेली. मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अश्या विविध प्रकारच्या उपक्रमाची माहिती सेलू येथील पुरस्कार वितरन सोहळा कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांना देण्यात आली. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे. आगामी काळात सर्व पत्रकारच्या पाठीशी असल्याचे सांगितले. यावेळी विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, मराठी पत्रकार परिषद चे राज्य अध्यक्ष मिलिंद अष्टिकर , सुरेश नाईकवाडे, मन्सूर खान, प्रकाश कांबळे, विजय जोशी, सचिन शिवशेट्टे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे, माजी अध्यक्ष गोवर्धन बियाणी, चारुदत्त चौधरी, प्रदीप नागापूरकर, नरेश दंडवतेसह अनेकांची उपस्थिती होती. या प्रसंगी मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मेहताब शेख, सचिव राजेश बंडे, प्रा. यशवंत बोडके, माजी जिल्हा संघटक संदीप कामशेटे, दादाराव आगलावे, आशिष कुलकर्णी, दत्तात्रेय कांबळे, संजय कांबळे, नामदेव श्रीमंगले, रामदास पाटील, शरद जोगदंड, जैनोदीन पटेल, विठ्ठल पाटील, राजू रोडगे मुक्रमबाद येथील गंगाधर चामलवाड, विनोद आपटे, लक्ष्मण कोळेकर, दादाराव गुमडे, संतोष हेसे उपस्थित होते. मुखेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने गणेश जयंती निमित विद्येचे आराध्य दैवत श्री गणेशाची प्रतिमा देवून एस. एम. देशमुख यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.