कंधार ( दिगांबर वाघमारे )
#संघटन_पर्व
भारताचे खंबीर,प्रभावशाली पंतप्रधान मा.श्री नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात सक्षम विकसित भारताचे ध्येय घेऊन वाटचाल करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे संघटन बळकट करण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी,भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष सौ.आ.चित्राताई वाघ,कार्यकारी अध्यक्ष रवींद्र जी चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये सौ प्रणीताताई देवरे चिखलीकर यांनी भारतीय जनता पार्टी चे वैयक्तिक प्राथमिक एक हजार सदस्य नोंदणी पूर्ण केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री चंद्रशेखर जी बावनकुळे यांनी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टीच्या संघटनपर्वामध्ये आपण १००० सदस्य नोंदणी करून त्यांना भारत देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेतल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !
भाजपाचे अंत्योदयाचे धोरण आपण जनमानसात घेऊन जात आहोत. यातून आपली लोकांप्रती असलेली बांधिलकी आणि पक्ष विचारांप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते. आपल्या या समर्पित योगदानाबद्दल पक्षाध्यक्ष म्हणून मला आदर आणि अभिमान वाटतो.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची मान जगभरात उंचावली आहे, तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र थांबणार नाही, याची सर्वांना खात्री आहे.
संघटनपर्वात किमान एक हजार सदस्य भाजपा सोबत जोडून आपण संघटना बळकट केलीच आहे, शिवाय महाराष्ट्राच्या विकासासाठीचे दूतही आपण जोडून घेतलेले आहेत.
आपल्या या योगदानाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन ! असे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्राप्त झाले .
त्याबद्दल सौ प्रणीताताई देवरे चिखलीकर यांनी ‘सर्वांचे आभार मानले .
#BJPSadasyataAbhiyan2024 #bjpsadasytaabhiyan #भाजपासदस्यनोंदणी #nanded
Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chitra Wagh Ravindra Chavan Pratap Patil Chikhalikar Pankaja Gopinath Munde Sambhaji Patil Nilangekar Sanjaykumar Kenekar – संजयकुमार केनेकर Sanjay Kaudge – संजय कौडगे Vikrant Patil
BJP Maharashtra BJP Mahila Morcha Maharashtra