फुलवळ ( प्रा भगवान आमलापुरे )
येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्य कारकुन गोविंदराव शंकरराव कुलकर्णी आणि प्रयोगशाळा सहाय्यक महेमुद पठाण यांचा आम्ही वर्गमित्र बॅच क्रमांक 1992 – 93 तर्फे सत्कार करण्यात आला. त्यामुळे गुरुजनांना गहिवरून आले.
अधिक माहिती अशी की रथसप्तमी, बुधवार दि 4 फेब्रु 25 रोजी सौ सुरेखा कैलासराव डांगे यांनी आपल्या सर्व वर्ग मैत्रीणीसाठी हळदी कुंकू आणि स्नेह भोजन आयोजित केलं होतं. या कार्यक्रमास 24 जणी सहपती सहभागी झाल्या होत्या. हळदी कुंकू आणि स्नेह भोजन यापुर्वीच आपल्या शाळेतील आणि हल्ली फुलवळमध्ये स्थायिक असणाऱ्या सेवानिवृत्त गुरुजनांचा सत्कारही करावा. ही कल्पना पुढे आली. ही कल्पना तातडीने सत्यात उतरवली ती विजयकुमार सादलापुरे यांनी.
यावेळी गोविंदराव शं कुलकर्णी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.या सत्कारामुळे गुरुजनांना गहिवरून आले. संध्याकाळी सौ सुरेखा कैलासराव डांगे यांच्या घरी हळदी कुंकू आणि स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडला.