प्रतिनिधी, कंधार
——————
तालुक्यातील मानसपुरे येथील किडे गल्लीतील रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले होते. आता या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे किडे गल्लीतील नागरिकांच्या वतीने मंगळवारी, ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८ वाजता सरपंच प्रतिनिधी बालाप्रसाद मानसपुरे, उपसरपंच किरण कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गोरे, संभाजी मानसपुरे, सचिन कांबळे, नारायण सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आनंदराव किडे, राजु किडे, संभाजी किडे, गोविंद किडे, गजानन किडे, शंकर किडे, नागोराव मुदखडे, माधव मुदखडे, पंडीत ठाकुर, दत्तात्रय शिंदे, बालाजी शिंदे, गजानन गोरे, आशोक गोरे, आनंदराव डोईजड, सदाशिव मुदखडे, माधव मुदखडे, तुकाराम मुदखडे, शिवा गोरे, संजय किडे, नारायण किडे, पांडुरंग किडे, लक्ष्मण किडे, शिवाजी कैलासे, यादव शिंदे, माधव किडे, आकाश देशमुख, संमय देशमुख, आदेश किडे आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.