(कंधार ; नरसिंग पेठकर )
संत गजानन महाराज यांचा दि २० फेब्रुवारी रोजी प्रकट दिन असतो.कंधार येथिल डॉ गजानन अंबेकर यांच्या श्री गजानन प्रसुतीगृह व बालरूणालयात १४७ वा प्रकट दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्य माजी आमदार भाई डॉ गुरुनाथराव कुरूडे ,माजी आमदार ईश्वररावजी भोसीकर ,अशोक अंबेकर,पत्रकार,प्रतिष्ठित नागरिक यांच्या सह अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .
डॉ.गजानन अंबेकर व सौ. डॉ.वसुधा अंबेकर यांच्या वतीने दरवर्षी संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन विविध कार्यक्रमाने साजरा केला जातो. दि 20 रोजी सकाळी संत गजानन महाराज यांच्या मुर्तीची महापुजा करून महाप्रसाद वाटप करण्यात आले .
यावेळी डॉ.रामभाऊ तायडे,डॉ दिपाली तायडे ,ॲड मारोती पंढरे,डॉ .संजय केंद्रे , डॉ ज्ञानेश्वर केंद्रे ,डॉ बालाजी कागणे , किशोर अंबेकर,डॉ बालाजी मद्रेवार ,डॉ लक्ष्मीकांत पेठकर ,ज्ञानेश्वर उगले ,व्यापारी वैभव काप्रतवार ,शेख रशीद ,महमंद सिंकदर,बसवेश्वर मंगनाळे ,राजहंस शहापुरे ,दिगांबर वाघमारे ,पत्रकार धोंडीबा मुंडे,मयुर कांबळे , योगेंद्रसिंह ठाकुर आदीसह भाविक भक्तांची यावेळी उपस्थिती होती .