मुखेड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त जोशी इन्फोटेक मुखेडच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या परिसरात सारथीच्या स्टॉलचे विशेष आयोजन करून मराठा व कुणबी मराठा समजासाठी सारथी या संस्थेमार्फत चालणाऱ्या निरनिराळ्या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. मुखेड- कंधारचे लोकप्रिय आमदार डॉ. तुषार राठोड आणि तहसीलदार राजेश जाधव यांनी सारथीच्या स्टॉलला भेट देऊन सदरील उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.
छत्रपति संभाजी महाराज संगणक कौशल्य आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे विद्यार्थी सविता कोल्हे, देवीप्रसाद वडजे, सतीश घारगे, प्रवीण शिंदे, रोहिणी शिंदे, ओमकार ताटे या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सारथी संस्थेमार्फत चालणाऱ्या निरनिराळ्या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच छत्रपती संभाजी महाराज संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सी.एस.एम.एस. डीप या कोर्स अंतर्गत संभाषण कौशल्य, मृदू कौशल्य, माहिती तंत्रज्ञान कौशल्य, ट्याली, डिटिपी, वेब डिझायनिंग, मोबाईल ॲप डेव्हलपमेंट असे अनेक संगणक कौशल्य आधारित कोर्सेस मराठा व कुणबी मराठा समाजासाठी मोफत उपलब्ध आहेत, आधी या संधी केवळ शहराच्या ठिकाणी उपलब्ध होत असे मात्र आता ग्रामीण भागात असलेल्या मराठा समाजासाठी ही संधी उपलब्ध झाली आहे असे जोशी इन्फोटेक चे संचालक जय जोशी यांनी सांगितले. या प्रसंगी मुखेडचे लोकप्रिय आमदार तुषार राठोड आणि तहसीलदार राजेश जाधव यांनी या उपक्रमाची स्तुती केली आणि जास्तीत जास्त मराठा समाजाच्या युवक आणि युवतींनी या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले. यावेळी सदाशिव पाटील जाधव, संतोष बोनलेवाड, डॉ. रणजीत काळे, नागनाथ लोखंडे, किशोरसिंह चौव्हान, राजेश गजलवाड, बबन ठाकूर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी जोशी इन्फोटेकचे आणि सारथीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.