महाकुंभ च्या पार्श्वभूमीवर प्रेमकुंभ

नांदेड ; प्रतिनिधी

महाकुंभ च्या पार्श्वभूमीवर झालेल्या प्रेमकुंभ या लायन्स रिजन कॉन्फरन्स चे आयोजन रिजन चेअरमन ला. रवि कडगे यांनी अतिशय दर्जेदार केल्यामुळे ही कॉन्फरन्स अविस्मरणीय झाल्याचे प्रतिपादन लायन्स 3234-H2 चे प्रांतपाल ला. गिरीश सिसोदिया यांनी केले.*

हॉटेल सीटी सिम्फनी येथे रविवारी लायन्स रिजन कॉन्फरन्स चे आयोजन करण्यात आले होते. प्रयागराज त्रिवेणी संगम येथून आणलेल्या पवित्र जलाचे मंथन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्घाटक म्हणून प्रांतपाल गिरीश सिसोदिया तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्रांतपाल राहुल औसेकर,पूर्व प्रांतपाल जयेश ठक्कर, दिलीप मोदी, नारायणदास कलंत्री, ॲड. प्रवीण अग्रवाल तसेच माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत हे उपस्थित होते. आलेल्या सर्व लायन्स सदस्यांना रुद्राक्षाची माळ घालून गंगाजल असलेले कुंभ देण्यात आले. आकर्षक व्यासपीठावर सर्व अतिथींचा सत्कार करण्यात आला. कॉन्फरन्सचे अध्यक्षस्थान रवि कडगे यांनी भूषविले.

कन्व्हेनर प्रा. रवि शामराज यांनी प्रास्ताविक केले. विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित असलेले यशवंत महाविद्यालयाचे मराठीचे विभाग प्रमुख प्रा. विश्वाधर देशमुख यांनी आपल्या भाषणातून प्रेमाची विविध व्याख्या श्रोत्यांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितली.प्रांतपाल गिरीश सिसोदिया, उप प्रांतपाल राहुल औसेकर, जयेश ठक्कर, दिलीप मोदी, नारायणदास कलंत्री, ॲड. प्रवीण अग्रवाल यांची समायोजित भाषणे झाली. यावेळी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. बॅनर प्रेझेंटेशन मध्ये कायापालट उपक्रमाचा सजीव देखावा करणाऱ्या लायन्स क्लब नांदेड सेंट्रल ला प्रथम पुरस्कार तर द्वितीय पुरस्कार लॉयन्स क्लब ऐंजल याना मिळाला. सांस्कृतिक कार्यक्रमात लायन्स मिडटाऊन ने पहिला क्रमांक मिळवला.

प्रेम कुंभ या विषयावर झालेल्या भाषण स्पर्धेत प्रथम डॉ मोहन देशमुख द्वितीय नीलम कासलीवाल यांनी बाजी मारली. सचिवांसाठी झालेल्या बेस्ट ऍक्टिव्हिटी प्रेझेंटेशन या स्पर्धेमध्ये प्रथम संगीता भंडारी द्वितीय विजय होकर्ने यांनी बक्षीस मिळवली. गतवर्षात केलेल्या कार्याबद्दल धर्मभूषण ॲड .दिलीप ठाकूर, प्रा. रवी शामराज, सदाशिव महाजन, बेस्ट प्रेसिडेंट प्रथम डॉ ज्योति जांगिड द्वितीय नीलम कासलीवाल,
यांना एप्रिसिएशन अवॉर्डने सन्मान करण्यात आला.
या रीजन कॉन्फ्रेंस मध्ये वर्षभरात रीजन रविचा कार्यशक्षेत्रत कार्यकरणार्या लॉयन्स क्लब नांदेड़, लॉयन्स क्लब नांदेड़ मिडटाऊन, सफायर, ऐंजल, प्राइड,सेंट्रल, लॉयन्स क्लब उदगीर, मातृभूमि,उमंग लियो लॉयन नांदेड़, रिजिंग,लियो लॉयन बसमत या क्लब ला उत्कृष्ट कार्यसाठी विविध पुरस्कारने सम्मानित कारण्यात आले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती जांगिड यांनी तर आभार प्रदर्शन शिवा शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झोन चेअर पर्सन गंगाबीशन कांकर , पारूल जैन, शीवकांत शींदे, सर्व क्लब चे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष सर्व कामिटी मेंबर यांनी परिश्रम घेतले. योग्य नियोजन, भरपूर मनोरंजन व दर्जेदार जेवणाची व्यवस्था केल्यामुळे रवि कडगे यांचे सर्वांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *