(कंधार :- दिगांबर वाघमारे)
हत्तीरोग दुरिकरण औषध उपचार मोहीम नांदेड जिल्ह्यातील दहा तालुक्यात दि. 10 फेब्रुवारी पासून राबविण्यात येत आहे. आज दि. 20 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय अधिकारी मा. डॉ प्रेमचंद कांबळे साहेब सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हत्तीरोग) पुणे यांनी कंधार येथील ग्रामीण रुग्णालय भेट दिली. एमडीए मोहीमेची माहिती घेतली. कंधार शहरात डॉ.किशोर कदम वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय कंधार यांच्या मार्गदर्शनानुसार मोहीम राबविण्यात येत आहे.आज प्रियदर्शनी नगर, सिद्धार्थ नगर भागात भेट दिली.
घरी जाऊन लाभार्थी यांनी गोळ्या सेवन केले आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी केली. कामा बाबत समाधान व्यक्त केले व सूचना दिल्या. पुढील दोन दिवसात उर्वरित तालुक्यात भेटी देणार आहेत. सर्वांनी जेवण करुन वयोमानानुसार डी.ई.सी व अल्बेडाँझोल गोळया सेवन करावे.असे डॉ.प्रेमचंद कांबळे सर यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित जिल्हा स्तरीय पर्यवेक्षक सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, ग्रामीण रुग्णालय कंधार येथील डॉ.शहाजी कुरे,अधिपरिचारिका शिल्पा केळकर,औघध निर्माण अधिकारी दिलीप कांबळे, आरोग्य कर्मचारी हणमंत घोरबांड, नरसिंग झोटिंगे, किरण कुलकर्णी, आरोग्य सेविका श्रीमती.चंचल गवाले आदी उपस्थित होते.