मुखेड: (दादाराव आगलावे)
तालुक्यातील सांगवी बेनक येथील श्री संत मन्मथ स्वामी माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंम्मेलन व पालक मेळावा मोठ्या उत्सहात संपन्न झाला असून
विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या
कलाविष्काराने रशिक मंञमुग्ध झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथील प्राचार्य डाॅ.हरिदास राठोड तर उद्घाटक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय मुखेडचे प्राचार्य डॉ शिवानंद अडकीने उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून मुखेड वैद्यकीय संस्थेचे सचिव डॉ.श्रीहरी बुडगेमवार, संस्थेचे सचिव शंकरराव होनशेट्टे, गौरव कन्स्ट्रक्शनचे संचालक मनोज कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बालाजी होनशेट्टे, सरपंच मिलिंद जोंधळे, उपसरपंच कु. अमृता मस्कले, माजी सरपंच उमाकांत मस्कले, चेअरमन विजयकुमार मस्कले, ग्रा.प.सदस्य बालाजी करडखेले, गजानन पत्की, प्रा. डॉ. ए. बी. गजमल, प्रा. डॉ. सी. एम. कहाळेकर यांची उपस्थिती होती.यावेळी डॉ. श्रीहरी बुडगेमवार, प्राचार्य डॉ शिवानंद अडकीने, प्राचार्य डाॅ. हरिदास राठोड यांनी विद्यार्थीना व पालकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बालाजी होनशेट्टे यांनी केले. पालक मेळाव्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात विघग्नहर्त्या श्री गणेशाला वंदन करुन मनिषा मस्कले,राजनंदनी घोरपडे या विद्यार्थीनिंनी वंदन नृत्य सादर केले. यावेळी महाराष्ट्राचे गौरव गीत, झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा, कोळी गीत डोल डोलते वाऱ्यावर या वेगवेगळ्या गितावर सादरिकरण केले.
–ह्दयाचा ठेका चुकवनारी मराठमोळी लावणी मराठमोळं लेन नताशा कांबळे हिने तर हिऱ्याची अंगुठी रुतून बसली कु. सुप्रिया गायकवाड हिने सादर केले. बंजारा गीत छम छम वाजे घुंगरारी जोडी सह मुख अभिनय, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्य भुमीवर स्टेज गित ,फनी डान्स, मराठी गित हृदयी वसंत फुलतांना, भिमराज की बेटी मै तो जयभीम वाली हू! बंजारा गित घुंगट वोढ लेना, मैने पायल है छनकाई, फिर भी दिल हैं हिंदुस्थानी अशा मराठी हिंदी व देशभक्ती गितावर बहरदार नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमात मनिषा मस्कले, राजनंदनी घोरपडे, समीक्षा मस्कले, सानिया कोकाटे, कोमल चव्हाण, आरती पवार, कोमल चव्हाण, महादेवी जाधव, वैष्णवी पवार, मानवी पांचाळ, मोहिनी माकणे,साक्षी भालके, सुप्रिया वाघमारे, कांचन वाघमारे, जयश्री श्रीकंठे, प्रियंका वाघमारे, नताशा कांबळे, ममता राठोड, दुर्गेश्वरी स्वामी, प्रज्ञा सुर्वे, पुजा राठोड, प्रणवी गजगे, शिवम बंडरे, युवराज राठोड, रुद्र पांचाळ, पांडूरंग बलूरे, मेघराजा जाधव, अभिनव धनवाडे, प्रसेनजित सुर्वे, कृष्णा पांचाळ, गुंडेराव हिप्परगे, संदेश जाधव, शिवम जाधव, युवराज वाघमारे, शाहू धनवाडे, दुर्गेश्वरी स्वामी, आश्विनी कल्याणे,संस्कृती होनशेट्टे, भाग्यश्री डावकरे, शिवलिला ढोसणे, मनीषा सोनकांबळे, धनश्री धनवाडे, प्रज्ञा सोनकांबळे, दिपाली गायकवाड, वैष्णवी भालके, नंदनी बंडरे यांच्या सह ११६ विद्यार्थीनी आपली कला सादर केली.
कार्यक्रम यशस्वितेसाठी
मुख्याध्यापक एम.आर. मोमिण, सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार दत्ताञय कांबळे, खुशाल केसे, एम. एस. सावरगावे, माणिकराव कुलकर्णी, गजानन होनशट्टे, सौ. मालती चमकुरे, सौ. संगीता गित्ते, कु. शिवाणी होनशेट्टे,
विश्वास चमकुरे, सुभाष होनशेट्टे, बालाजी सुर्यवंशी, गणेश मस्कले, विजय घाळे व शाळेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे भहाादार सूत्रसंचालन दत्ताञय कांबळे यांनी केले. कार्यक्रमास सांगवी व परिसरातील पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.