*कंधार/प्रतिनिधी संतोष कांबळे*
तालुक्यातील बोरी खुर्द येथील बालाजी ज्युनिअर कॉलेज मध्ये बारावीच्या परीक्षेला नकलांचा सुळसुळाट सुरू असल्याचा प्रकार गुरुवारी दि. २० फेब्रुवारी रोजी समोर आला. उपशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी कॉलेजला भेट दिली असता १२ विद्यार्थी नकल करताना आढळले. या नकल बहाद्दरावर कारवाई करण्यात आल्याची माहिती शेटकार यांनी दिली.
बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात घेण्याचा संकल्प जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोडला होता. त्या अनुषंगाने प्रशासनाने नियोजन केले आहे. कॉपीमुक्ती अभियानामुळे विद्यार्थ्यांनी धसका घेतल्याचे चित्र आहे. परंतू काही ठिकाणी कॉपीमुक्त अभियान पूर्णपणे राबविले जात असताना काही शाळा मध्ये सर्रास कॉप्या सुरू आहेत. अशावेळी भरारी पथक हिट लिस्टवर असलेल्या शाळांवर फोकस करून पाठ थोपटून घेत आहे.
गुरुवारी रसायनशास्त्राचा पेपर होता. जिल्हास्तरीय पथक प्रमुख प्राथमिक उप शिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी बोरी खुर्द येथील बालाजी ज्युनिअर कॉलेजला भेट दिली असता १२ विद्यार्थ्यांना कॉपी करताना आढळले. या सर्व कॉपी बहाद्दरांचे उत्तर पत्रिका जप्त करून त्यांच्यावर रेस्टिकेटची कारवाई करण्यात आली. या प्रकारामुळे कॉपीमुक्त अभियानाला शाळांनी केराची दाखवल्याने चव्हाट्यावर आले आहे.