मागच्या अनेक वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक चळवळीत पूर्ण वेळ स्वतःला समर्पक व निस्वार्थ भावनेतून झोकून देऊन काम करणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड बहीशाल शिक्षण केंद्राचे व्याख्याते तथा मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव रमेश पवार यांनी महामानवांच्या चरित्रावर शेकडो मोफत व्याख्याने देत वेगवेगळ्या विषयासह महामानवा चरित्रावर संशोधनात्मक लेखन केले आहे.
त्यांचे अनेक लेख वर्तमान पत्रातून मासिकातून प्रसिद्ध झाले आहेत.चिकित्सक, संशोधनात्मक तर्कशुद्ध विचारातून ऐतिहासिक सिद्धांतावरील उदाहरणासह वर्तमानात ही सर्व महामानवे समस्त मानवांसाठी कशी प्रेरक आहेत. हे विविध लेखाच्या माध्यमातून “प्रेरक महामानव” शब्दबद्ध केलेला आहे.
विद्यार्थी व तरुणाईला प्रभावीपणे भाषण करता यावे म्हणून प्रभावी भाषण एक कला हे पुस्तक लिहीले असून विद्यार्थी, पालक व समाजाला दिशा दाखवणारे प्रेरक महामानव, प्रभावी भाषण एक कला,पर्यावरण शिक्षण भविष्याची गरज,
विद्यार्थी आणि व्यक्तिमत्व विकास,
अभ्यास कसा करावा? अशा पाच पुस्तकाचे प्रकाशन
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ,जिजाऊ ब्रिगेड व ३२ कक्ष नांदेड आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण,माजी खासदार तथा आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर,नांदेडचे खासदार रविंद्र पाटील चव्हाण, माजी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री डी. पी.सावंत, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, मराठा समाज भूषण माधवराव पाटील शेळगावकर,काॅग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बी.आर.कदम, उद्योगपती मारोतराव पाटील कवळे, माजी सनदी अधिकारी अनिल मोरे, राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डाॅ. गोविंद नांदेडे, डाॅ, रेखाताई चव्हाण, माजी महापौर जयश्रीताई पावडे, इंजि तानाजी हुस्सेकर, प्रा. संतोष देवराये,माजी सभापती संजय पाटील शेळगावकर, नानाराव कल्याणकर, उध्दवराव सुर्यवंशी, डाॅ. सुनील कदम आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. मराठा सेवा संघाची शिकवण लिहीते व्हा,बोलते व्हा..! अशी आहे. लेखनासाठी प्रेरणा युगनायक अॅड पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्यामुळे मिळाली ही पाच पुस्तके वाचक वर्गांच्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. सर्व चोखंदळ वाचकवर्ग या पुस्तकाचे स्वागत करेल अशी भावना लेखक रमेश पवार यांनी व्यक्त केली.
अत्यंत समाजोपयोगी या पाच पुस्तकाचे प्रकाशन झाल्याबद्दल लेखकाचे मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मधुकरराव देशमुख,राष्ट्रीय अध्यक्ष कामाजीराव पवार,इंजि शे.रा.पाटील, पूर्व शिक्षणाधिकारी शिवाजीराव खुडे,डाॅ.सोपानराव क्षिरसागर, प्रा.डाॅ.पंजाबराव चव्हाण, प्रा. संतोष देवराये, इंजि शिवाजीराजे पाटील, इंजि तानाजी हुस्सेकर, पूर्व शिक्षण संचालक डाॅ.गोविंद नांदेडे,पूर्व अति. मु.का. अ.शिवाजीराव कपाळे, प्रा.डाॅ.हनुमंत भोपाळे, नानाराव कल्याणकर उध्दवराव सुर्यवंशी, भगवानराव ताटे,शिवाजी पाटील आलेगावकर, शिवा कांबळे,पंडीत पवळे, व्यंकटराव जाधव, माजी जिल्हाध्यक्ष पंडीतराव कदम चिखलीकर भंडारा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के,नांदेड जिल्हापरिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डाॅ.सविता बिरगे,गटशिक्षणाधिकारी सतिश व्यवहारे,
देविदासराव बस्वदे, अशोक पाटील, सुधाकर थडके, बंडु पाटील,संकेत पाटील,परमेश्वर पाटील, सुभाष कोल्हे,बालाजी सिरसाट,कृष्णाताई मंगनाळे, सुरेखाताई रावणगावकर,अरूणाताई जाधव,डाॅ विद्याताई पाटील, सुमित्राताई वडजकर, कल्पनाताई चव्हाण,अर्चनाताई होगे,वनिताताई देवसरकर आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.