आज मातृदिन आहे कि नाही माहीत नाही पण माझ्या वाचकाने मातृदिनाच्या शुभेच्छा पाठवल्या .. सकाळी रोजच्या प्रमाणे टेकडीवर गेले होते.. तिथे आम्ही काही झाडे लावली आहेत.. एक गृप आहे त्यांनी तर मोठी बाग तयार केली आहे.. मी सकाळी टेकडीवर गेले कि बागेत फेरफटका मारुन येते .. खूपच प्रसन्न वाटतं.. त्यांनी तिथे एक मंदिर केलय जिथे दर शनिवारी आरती असते..
त्याच्याच १०० मीटरवर मी आणि माझ्या मित्राने पावसाळ्यात एक वडाचं झाड लावलं होतं.. त्यावेळेस त्याला खुप छान पालवी आली आणि आता उन्हाने ते पुर्ण सुकुन गेलं.. त्याला पाहून खूपच वाईट वाटलं तरीही मला थोडी आशा होती.. मी त्याला तिथून काढलं आणि जिथे इतर झाडं आहेत तिथे नेउन लावलं त्यामुळे त्याला इतर झाडासोबत पाणीही मिळायला लागलं आणि त्यालाही त्याचे झाडरुपी मित्र भेटल्याचा आनंद झाला असावा.. पूर्ण मुळं सुकून गेलेल्या झाडाला आज पुन्हा पालवी आलेली पाहून समाधान वाटलं .. त्याला पाणी दिलं आणि कृतज्ञता व्यक्त केली.. आज मातृदिन असो कि नसो त्या बाळाने मला आईचं सुख दिलं..
झाडानाही कंपॅनीयनशिप हवी असते.. यावरुन एक किस्सा सांगते.. माझ्या गार्डन मधे मी पिवळी जास्वंद लावली होती.. खूपच हेल्दी आणि सुंदर फुलं यायची.. त्याच्या शेजारी एक मोगऱ्याची कुंडी होती ती मी उचलून दुसरीकडे ठेवली आणि तिथे वेगळे झाड ठेवले.. चार पाच दिवसांनी मोगरा सुकायला लागला.. मी म्हटलं , याला अचानक काय झालं ?? .. विचार करत मागे वळणार तितक्यात त्याच्या फांदीत माझ्या ड्रेसची लेस अडकली.. जणु काही त्या मोगऱ्याने मला पकडलं , बहुधा त्याला हे सांगायचे होते कि मला माझ्या मित्राशेजारी रहायचय तु का मला इकडे आणलस ??.. विशेष म्हणजे मला त्याची भाषा समजली म्हणुन मी ते झाड तिथून उचलून आधीच्या ठिकाणी ठेवलं आणि त्याला पुन्हा पालवी आली.. या झाडान्मुळे , प्राण्यांमुळे मी अनेकदा मातृत्वाचा अनुभव घेतला आहे.फक्त आपल्याला तो भाव असायला हवा म्हणजे प्रत्येक क्षणी देवही भेटतो..
काही कारणाने जे आईबाबा होवु शकत नाहीत त्यांनी नाराज न होता अशा पध्दतीने मातृत्वाचा आनंद जरुर घ्यावा..
निसर्ग रोज आपल्याला भरभरुन देत असतो फक्त आपल्याला आपली ओंजळ मोठी करता यायला हवी..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist