अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )
येथील कवी आणि शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या नांदेड फार्मसी काॅलेजचा विद्यार्थी विजय पवार आणि नितेश चव्हाण यांनी सादर केलेल्या पोस्टर प्रदर्शनात सर्व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सदरील स्पर्धा. …… लातूर येथील दयानंद सायन्स कॉलेज लातूर येथे पार पडल्या . नुकताच त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. यात नांदेड येथील नांदेड फार्मसी कॉलेज चा विद्यार्थी आणि कवी विजय पवार आणि नितेश चव्हाण यांनी IN-VITRRO ANTHELMINTIC ACTIVITY ON PLUMERIA RUBRA L.या विषयावर प्रकल्प सादर केला होता.सादर केलेल्या पोस्टर प्रदर्शनात त्यांना सर्व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. तसं त्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिक मिळाले आहे.त्यांना त्याबद्दल त्यांचे प्राचार्य डॉ. एन. बी. घिवारे, प्रा. डॉ. एस. के. सर्जे, प्रा. डॉ . ए. बी. रोगे, प्रा. एस. ए. फारूकी, आणि प्रा. ए. के. दासवाड सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शिवाय एन डी राठोड आणि भगवानराव आमलापूरे , गणेश चव्हाण यांनीही अभिनंदन केले आहे.