(कंधार ; प्रतिनिधी )
#नांदेड
दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली शासन प्रशासन जागे करण्यासाठी अनेक निवेदने, मोर्चे आंदोलने करून न्याय हक्क मिळत नसल्यामुळे
पुन्हा प्रशासन जागे करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार,सर्व गटविकास अधिकारी यांना डाकोरे पाटिल शिष्टमंडळासोबत भेट घेऊन मा.
माजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत नांदेड यांनी संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल त्यांच्या शिष्टमंडळा सोबत सात बैठका घेऊन निर्देश,व आदेश देऊन तहसिलदार , गटविकास अधिकारी संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या निर्देश व आदेशाला केराची टोपली का दाखवत असल्याबाबत विचारणा करण्यासाठी व पुढील आंदोलनाचा इशारा देण्यासाठी दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी कंधार येथे गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांची बैठक चालु असता मा. गटविकास अधिकारी यांनी बैठकीत शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारून डाकोरे सोबत चर्चा करून संबंधित ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांना आदेशित करून आदेशित केले.
तसेच कंधार तहसीलदार साहेबांनी निवेदन स्विकारून संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन आदेशित केले.
दिव्यांग,वृध्द निराधाराचे प्रश्न सोडविण्यासाठी आदेशित करून मुध्दतीत न सुटल्यास दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोणतीहि पुर्व सुचना न देता त्रिवृ आंदोलनाचा इशारा निवैदनाद्वारे दिला.
शिष्टमंडळात चंपतराव डाकोरे पाटिल,चांदु गवाले,मारोती बोईनवाड,भुंजग टोपे,महेबुब शेख,गौतम कांबळे, शंकर कौसले, असद शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली