अहमदपूर ( प्रतिनिधी ) अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर येथे सध्या चालू आहे. या संमेलनास अहमदपूर येथील साहित्यिक आणि विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, कवी एन डी राठोड, सुप्रसिद्ध सुत्रसंचालक राजेसाहेब कदम, प्रा शिवा कराड , आधारवड या कविता संग्रहाचे कवी शिवाजीराव नामपल्ले , शाहीर सुभाष साबळे, वर्षा माळी मॅडम, कवयित्री सौ रंजना गायकवाड , सीता कुदळे, कवी संजयकुमार भोसले आणि महेंद्र धसवाडीकर सहभागी झाले आहेत.
आज रविवार दि 23 फेब्रु 25 रोजी या सर्व सन्माननीय कवींनी आणि कवयित्रींनी सकाळच्या सत्रात आपल्या कविता सादर केल्या.आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ ऋषिकेश कांबळे , कंधारकर, ; प्रा डॉ शेळके , कवी मदनराव अंभोरे पाटील सुकळीकर, गीतकार अहमद पिरेन साब वसमत, प्रा डॉ एम डी इंगोले गंगाखेड यांच्या सोबत त्यांनी संमेलनस्थळी , सेल्फी पाॅइंटवर छायाचित्र घेतले.