उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत

 

#नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आज एक दिवसाच्या नांदेड, परभणी दौऱ्यासाठी श्री. गुरू गोविंद सिंघ जी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले.

यावेळी त्यांचे आमदार विक्रम काळे, प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर आ.आनंद शंकर तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. जिल्ह्यामधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ते नांदेड व परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

विमानतळावर त्यांनी स्वागत स्वीकारतानाच या ठिकाणी आलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या शिष्टमंडळाला भेट दिली त्यांचे निवेदन स्वीकारले.

 

00000

Ajit Pawar
Atul Save
Maharashtra DGIPR
CMOMaharashtra
DDSahyadri
Doordarshan National (DD1)
Collector Office, Nanded
Nanded Police
विभागीय माहिती कार्यालय, लातूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *