(कंधार ; दिगांबर वाघमारे )
कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली कंधार तालुक्यातील प्रत्येक गावागावात वस्ती तांड्यावर कॉग्रेस पक्षाचे कार्य भक्कम करण्याचे काम सुरू आहे .त्याचाच एक भाग म्हणून आज कंधार येथे युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष महेश भोसीकर यांच्या संपर्क कार्यालयात काही निवडी बिनविरोध करण्यात आल्या त्यामध्ये लोहा-कंधार विधानसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अविनाश किशनराव आंबटवाड व उपाध्यक्षपदी शेख सुरज सय्यदसाब यांची निवड बिनविरोध करण्यात आली .
लोहा-कंधार विधानसभा युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी अविनाश किशनराव आंबटवाड व शेख सुरज सय्यदसाब या दोघांना नियुक्तीचे पत्र देऊन भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी, कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष महेश भोसीकर, युवक काँग्रेस कंधार शहराध्यक्ष अजय मोरे, यावेळी काँग्रेस सेवादलाचे कंधार तालुका अध्यक्ष रमेशसिंह ठाकुर, ग्रामपंचायत सदस्य संजय आंबटवाड, बंटी आंबटवाड, ओम पाटील पेटकर, शेख नयर आदीची यावेळी उपस्थिती होती.
छाया- विनोद महाबळे