धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )
येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात दि 27 फेब्रु 25 रोजी सकाळी ठीक 11 00 वाजता मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांची उपस्थिती होती. प्रा जंगीटवार व्ही आर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. जी भाषा बेंबीच्या देठापासून ओठांवर येते ती प्रमाण भाषा असते. असे विचार प्रा जंगीटवार व्ही आर यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांनी मराठी भाषा आणि साहित्याचा आढावा घेतला. काही अजरामर मराठी गीतांची आठवण त्यांनी करून दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सुत्रसंचलन, प्रास्तविक आणि आभार प्रा डॉ रमाकांत गजलवार यांनी केले.