(कंधार ; दिगांबर वाघमारे )
मन्याड खोर्यातील प्रति पंढरपूर अर्थात धाकटे पंढरपूर येथील वंदनीय संत नामदेव महाराज मठ संस्थान उमरज येथील महंत एकनाथ नामदेव महाराज उमरजकर यांच्या सुनियोजात १०८ कुंडी विष्णूयाग यज्ञ,मठ संस्थानातील मंदिराचा कलाशारोहण या धार्मिक सोहळ्यात आपल्या ओजस्वी सुमधुर सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवतकथा सांगणारे आंतरराष्ट्रीय कथाकार वंदनीय देवकिनंदन ठाकूरजी यांच्या कथेने या धार्मिक कार्यक्रमात सात दिवस कथेतून हिन्दी भाषिक असून सुध्दा मराठी बोलण्याचा उत्तम प्रयत्न करुन कथा श्रवण करणाऱ्या लाखो सद् भक्तांच्या मनी गारुड घालत प्रथमच मराठीतले श्री विठ्ठलांची सुमधुर आवाज उत्कृष्ट गीताने उमरज मठ संस्थानच्या गोपालन,कोरोना काळातले अन्नछत्र,अनेक धार्मिक,देशाभिमानी वृत्ती सहित अनेक उपक्रम कार्यक्रमाचे तोंड भरुन कौतुक केले.
परीसर अक्षरशः दुमदुमून टाकले.यांचे दर्शन घेण्यासाठी माझ्यासह माझी सुकन्या दृष्टी अन् अधिश्वरी सौ.संगीता यांचे समवेत भेटीचा योग आला.त्यावेळेस वंदनीय देवकिनंदन ठाकूरजी यांना राधे-राधे म्हणत,माझ्या हस्तकलेतून निर्माण झालेली ४ फुट लांबीची बासरी(पावा) त्यांच्या समर्थ करकमलात देवून आशीर्वाद घेतांना मला खुपच समाधान वाटले.कारण देवकिनंदन म्हणजेच कृष्ण साक्षात कृष्ण भगवानाच्या हाती हस्तकलेतून निर्माण झालेली बासरी देतांना आनंद वाटला.
दत्तातय एमेकर
.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार